सरकारी क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण ८० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
या भरतीमध्ये एकूण ८० जागा असून त्यामध्ये ट्रेड अप्रेंटिस (ITI) पदाच्या ५० जागा, डिप्लोमा अप्रेंटिसच्या १६ जागा आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या १४ जागांचा समावेश आहे
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी इलेक्ट्रिशियन, फिटर आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डिप्लोमा अप्रेंटिससाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आवश्यक आहे. तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेतील पदवी तसेच ह्युमन रिसोर्स, फायनान्स अँड अकाउंट्स यांसारख्या विभागांसाठी संबंधित पदवी आवश्यक आहे.
१८ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे असावे. ट्रेड अप्रेंटिससाठी कमाल वयोमर्यादा २४ वर्षे, डिप्लोमा अप्रेंटिससाठी २५ वर्षे, तर ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी २६ वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार सवलत मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा १०,५६० ते १२,३०० रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी १२ महिन्यांचा असेल.
उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणांच्या आधारे गुणवत्तायादी तयार करून केली जाणार आहे. अर्जासाठी ITI उमेदवारांनी NAPS 2.0, तर डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांनी NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर NPCIL च्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
अर्जाची अंतिम तारीख : १८ नोव्हेंबर २०२६, सायंकाळी ४ वाजेपर्यंत आहे. तसेच अधिक माहितीसाठी www.npcilcareers.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.