Maharashtra RTO HSRP Number Plate : अजूनही तुमच्या गाडीला 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' म्हणजेच HSRP नंबर प्लेट बसवली नसेल, तर आताच सावधान व्हा. कारण संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आरटीओने (RTO) अशा वाहनांविरोधात मोठी धडक मोहीम उघडली आहे. ३० जूनची अंतिम मुदत संपल्यानंतरही ज्या वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावलेली नाही, त्यांच्यावर आता थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मागील दोन महिन्यांत (१ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान) राज्यभरात तब्बल ५७,८८८ गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहनधारकांकडून १ कोटी १६ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईचे वडाळा आरटीओ, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये आरटीओने सर्वांत मोठा दणका दिला आहे. आरटीओकडून फक्त दंडच घेतला जात नाही. तर ही नंबर प्लेट नसणाऱ्या गाड्यांचे मालकी हक्क हस्तांतरण, पत्ता बदलणे आणि लायसन्स नूतनीकरण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या सरकारी सेवांवरही बंदी घालण्यात येत आहे. त्यामुळे तुमची गाडीही या कारवाईच्या रडारवर आहे का? हे तपासून पाहा
वडाळा RTO अंतर्गत मुंबईत सर्वाधिक म्हणजेच २,४१५ वाहने विना-HSRP आढळली.
सर्वाधिक वाहने आढळलेला भाग हा नाशिक आहे. नाशिक (MH 15) मध्ये सर्वाधिक ५,३३९ वाहने आढळली.
हिंगोलीमध्ये सर्वात कमी वाहने आढळलेला भाग आहे. हिंगोली (MH 38) मध्ये सर्वात कमी ११८ वाहने आढळली.
ठाण्यामध्ये सर्वाधिक दंड वसुली करण्यात आली आहे. ठाणे (MH 04) मधून सर्वाधिक ₹४६.४ लाख दंड वसूल करण्यात आला.
दुसऱ्या क्रमांकाची दंड वसुली बारामतीमध्ये (MH 42) करण्यात आली. बारामतीमधून ₹९.९ लाख दंड वसूल करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी HSRP लावणे बंधनकारक आहे. आतापर्यंत १.१ कोटी वाहनांना HSRP बसवण्यात आले आहे.
HSRP बसवण्याचा खर्च किती?
दुचाकी (Two-wheeler): ₹५३१
तीन चाकी (Three-wheeler): ₹५९०
चार चाकी (Four-wheeler): ₹८७९
दंड आणि सेवांवर येणारे निर्बंध (Non-Compliance Rules)
मोटार वाहन कायद्यानुसार HSRP न बसवल्यास साधारणपणे ₹१,००० चा दंड आकारला जातो. फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे.
आम्ही १ जुलैपासून अंमलबजावणी सुरू केली असून महाराष्ट्रात आतापर्यंत तपासलेल्या सुमारे २ लाख वाहनांपैकी जवळपास २९% वाहने HSRP नंबर प्लेट नसलेली आढळली आहेत. ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील.— शैलेश कामत (संयुक्त परिवहन आयुक्त)
HSRP नंबर प्लेट नसेल तर कोणत्या सेवांवर बंदी?
वाहनाचे मालकी हक्क हस्तांतरण (Ownership Transfer)
पत्ता बदलणे (Address Change)
हायपोथिकेशन अपडेट्स (Hypothecation updates - बँक कर्ज नोंदी)
पुनर्नोंदणी (Re-registration)
वाहनात बदल करणे (Vehicle modifications)
ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण (Licence renewals)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.