Ladki Bahin Yojana Meta Ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana : परप्रांतीय लाडकीनंही लुटलं, बोगस लॉग-ईन आयडीचे हजारो अर्ज; यूपी, आसाम, प. बंगालच्या भामट्या बहिणी

Ladki Bahin Yojana News : परप्रांतीय लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. नेमक्या कोणत्या राज्यातल्या आणि किती लाडक्या बहिणींनी लुटालूट केलीय ? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Girish Nikam

Ladki Bahin Yojana Updates : राज्यात तब्बल ३० लाख लाडक्या बहिणी नियमबाह्य असल्याची चर्चा सुरू असताना आता थेट परप्रांतीय लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचं समोर आलंय. या योजनेतील परराज्यातल्या बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट समोर आलंय. अस्पष्ट कागदपत्रं आणि आधार क्रमांकाच्या आधारे फसवणूक करण्याचा या हजारो भामट्या बहिणींचा प्रयत्न होता. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नक्की हे रॅकेट कसं कार्यरत होत ते पाहूया.

लाडकी बहीणमध्ये परप्रांतीय रॅकेट

- सांगली, लातूरमधल्या अंगणवाडी सेविका दाखवून बनवले लॉग-ईन आयडी

- अंगणवाडी सेविकांच्या बोगस आयडीवरुन 1171 अर्ज भरण्यात आले

- आधार कार्डवरचा पत्ता दिसू नये म्हणून अस्पष्ट दिसणारी कॉपी अपलोड

- एकही मुस्लीम महिला नसणाऱ्या गावातील मुस्लीम महिला लाभार्थी दाखवल्यानं भांडाफोड

- आधार क्रमांकाशी लिंक खातं यूपी, आसाम, प. बंगाल, राजस्थानमधल्या व्यक्तींचं

दरम्यान ही बनवेगीरी समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी योजनेतील अनियमीततेची चौकशी करुन कारवाई करु, असं म्हटलंय. तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. अनियमीततेची चौकशी करुन कारवाई करु असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर सरकारी एजन्सीनं उत्तर दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलीय.

आता अशा परप्रांतीय भामट्या बहिणींकडून वसुली करण्यात येईल, असं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. मोठा आर्थिक भार असलेल्या लाडकी बहिण योजनेचे तब्बल 2 कोटी 34 हजार लाभार्थी आहेत. आत्तापर्यंत सात हफ्ते लाडकीला मिळाले आहेत. भविष्यात योजनेत फक्त अपेक्षित गरजू लाभार्थीच राहतील आणि बाकी श्रीमंत आणि बोगस अर्ज निकाली निघतील अशी आशा करुया.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT