Maharashtra Government Education Scheme saam tv
बिझनेस

Maharashtra Exam Fee Refund : दीड लाख विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्काचे ५० टक्के पैसे थेट खात्यात जमा होणार

Maharashtra Government Education Scheme : महाराष्ट्र सरकारच्या परीक्षा शुल्क माफी निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पात्र विद्यार्थ्यांना शुल्क परतावा देण्याची प्रोसेस सुरू केली आहे. या निर्णयामुळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या तब्बल १ लाख ४९ हजार २७९ विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

या विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षा शुल्कापैकी ५० टक्के रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. यासाठी जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या महाविद्यालयांना ६ कोटी रुपये वर्ग करण्यात आले. तर धुळे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम पुढच्या आठवड्यात मिळणार आहे.

तसेच, परीक्षा शुल्क माफ असतानाही विद्यार्थ्यांकडून हमीपत्रे का मागितली जातात,असा सवाल उपस्थित होतो. ही अट रद्द करून शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनाही तातडीने शुल्कमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी अभाविपचे प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी केली आहे.

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या ३३ जिल्ह्यांमधल्या ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढच्या तीन महिन्यात पाच किलो मोफत धान्य मिळेल. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू दिले जाणार आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील आणि DBT योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १४ निर्णय घेतले गेले आहेत. नंदुरबारमधील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली. यामुळे २६ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्याही व्हॉट्सॲप मध्ये दिसतंय गोलकार चिन्हं? WhatsApp मध्ये दिसणारं Purple Circle नेमकं काय आहे?

Heart Attack Symptoms : प्रत्येकवेळी छातीत कळ आली म्हणजे हार्ट अटॅक नाही, त्याआधी शरीर देतं 5 संकेत

Maharashtra News Live Update: दुष्काळी परिस्थितीत हळद पिकाचे व्यवस्थापन करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Mangalsutra Vati Design: नव्या नवरीसाठी मंगळसूत्राच्या हटके वाटी डिझाइन्स; पारंपरिक अन् मॉडर्न कलेक्शन पाहिलंत का?

BJP Leader Arrested : घरात आढळल्या ६४५ दारूच्या बाटल्या, भाजप नेत्याला अटक, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT