Maharashtra Budget 2025 Pune Ajit Pawar Saam Tv
बिझनेस

Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पात पुण्याला काय मिळालं? या महत्वाच्या १० घोषणा

Pune News : अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातील प्रकल्पाचा समावेश होता. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून पुण्याला काय-काय मिळालं? वाचा

Yash Shirke

Maharashtra Budget Pune : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी 'महाराष्ट्र आता थांबणार नाही.. विकास आता लांबणार नाही', असे म्हटले. अजित पवार यांनी विविध घटकांशी संबंधित अनेक घोषणा देखील केल्या. ते अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करत होते.

अर्थसंकल्पामध्ये पुणे शहर आणि आसपासच्या परिसराला फायदा होईल अशा योजनांची माहिती अजित पवारांनी दिली. पुणे मेट्रोचा विस्तार, पुणे-पिंपरी चिंचवड भागात टेक्निकल टेक्सटाईल मिशन अशा अनेक प्रकल्पांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून पुण्याला काय मिळालं? जाणून घ्या.

१. वाहतूक आणि पायाभूत सुविधा

- पुणे मेट्रो विस्तार – पुढील वर्षभरात २३.२ किमी नवीन मेट्रो मार्ग सुरू होणार.

- पुणे-शिरूर उन्नत मार्ग – ५४ किमी, ७५१५ कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प.

- तळेगाव-चाकण उन्नत मार्ग – २५ किमी, ६४९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित.

२. औद्योगिक आणि आर्थिक विकास

- पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन.

- पुण्यात IT आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांसाठी नवीन गुंतवणूक आणि प्रोत्साहन योजना.

३. पर्यावरण आणि शाश्वत विकास

- सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प – पुण्यात मोठ्या प्रमाणावर पुनर्वापर योजना.

- हरित ऊर्जा प्रकल्प – वीज दरात बचत करणारी उपाययोजना.

४. कृषी आणि ग्रामीण विकास

- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज.

- जलयुक्त शिवार योजना २.० – पुणे जिल्ह्यातील ५००+ गावांसाठी जलसंधारण प्रकल्प.

- नदीजोड प्रकल्प – पुण्यातील शेतीसाठी पाणीपुरवठा वाढवण्याचे नियोजन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT