इराण-अमेरिकेत तणावजन्य परिस्थिती
एलपीजीच्या नियमात केले महत्वाचे बदल
१ जूनपासून नियमात होणार बदल
पश्चिम आशियाच्या इराण-अमेरिकेत तणावजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने जगभरातील विविध देशात इंधनाचा तुटवडा जाणवत आहेत. इंधनाच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर भारतात LPG च्या नियमात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता नवीन नियम १ जूनपासून लागू होणार आहेत.
देशात पीएनजी कनेक्शनची संख्या वाढू लागली आहे. परंतु काही ठिकाणी सरकारने निर्दश दिल्यानंतरही LPG सिलिंडरचा वापर केला जात आहे. पीएनजी कनेक्शन मार्चपर्यंत ६.५ लाख होते.
अनेक कुटुंबांनी एलपीजी सिलिंडरऐवजी पीएनजी कनेक्शन घेतले आहेत. सरकारच्या निर्देशानुसार, पीएनजी आणि एलपीजी याचे दोन्ही कनेक्शन असतील, त्यांना एलपीजी सिलिंडर पुन्हा एजन्सीला द्यावे लागतील. त्यांना केवळ पीएनजी कनेक्शनचा वापर करावा लागेल, परंतु काही जण एलपीजी सिलिंडर पुन्हा एजन्सीला देण्यास टाळाटाळ करत आहेत. मागील दशकात एलपीजी वापरणाऱ्यांची संख्या ३३.५ कोटी इतकी झाली आहे. तर पीएनजी युजर्सची संख्या १.६४ कोटी झाली आहे.
एक कुटुंब, एक कनेक्शन
भारतात ज्या कुटुंबाकडे पीएनजी कनेक्शन आहेत. त्यांना एलपीजी सिलिंडर पुन्हा संबंधित एजन्सीला द्यावे लागतील. तेल वितरण करणारी कंपनी घरगुती सिलिंडर गैरवापर, काळाबाजार रोखण्यासाठी पीएनजी आणि एलपीजी या दोन्हीचा वापर करणाऱ्यांची नोंद करणे सुरू केलं आहे. आता दोन्हीपैकी एकाचा वापर करण्यास शासनाने आवाहन केलं आहे.
एलपीजी कनेक्शन ट्रान्सफर
पीएनजी कनेक्शन मिळाल्यानंतर ३० दिवसांत एलपीजी कनेक्शन बंद करण्यास सांगितलं आहे. तसेच ज्या भागात पीएनजी कनेक्शन नाही, त्या भागात पुन्हा एलपीजी सिलिंडर वापरता येईल.
जून महिन्यापासून सिलिंडर मिळणे होईल मुश्किल
जून महिन्यापासून पीएनजी पाइपलाइन असलेल्या क्षेत्रात एलपीजी सिलिंडर बुक करणे किंवा रिफिल करण्यास रोखलं जाणार आहे. शहरात गॅस वितरण कंपन्या आणि तेल विपणन कंपन्यांनी डिजिटल डेटाबेस पूर्णपणे एकीकृत केलं जाणार आहे. पीएनजी कनेक्शन मुदतवाढीची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आलीये.
गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी डेडलाइन
शहरात एलपीजी सिलिंडर बुकिंग करण्यासाठी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत केला आहे. तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी ४५ दिवसांपर्यंत अवधी ठेवला आहे.
कनेक्शन आणि सबसिडीचे नियम
काही कुटुंबांना वर्षाला १२ अनुदानित घरगुती सिलिंडर मिळतात. अतिरिक्त सिलिंडरसाठी बाजारभावाप्रमाणे शुल्क आकारले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.