LPG Price Today meta ai
बिझनेस

LPG Cylinder : शहरी आणि ग्रामीण भागातल्या LPG ग्राहकांना दुसरा गॅस सिलिंडर कधी बुक करता येणार? नवीन अपडेट समोर

LPG Booking : शहरी आणि ग्रामीण LPG ग्राहकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आता सर्व घरगुती ग्राहकांना मागच्या सिलिंडरच्या डिलिव्हरीनंतर २५ दिवसांनी पुढील रिफिल बुक करता येणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

LPG ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता शहरी आणि ग्रामीण भागातला घरगुती LPG ग्राहकांसाठी रिफिल बुकिंगचा कालावधी समान करण्यात आला असून, सर्व ग्राहकांना २५ दिवसांनी पुढचा सिलिंडर बुक करता येणार आहे. हा बदल तात्काळ लागू करण्यात आलेला आहे.

याआधी शहरी भागातल्या ग्राहकांना २५ दिवसांनी, तर ग्रामीण भागातल्या ग्राहकांना पुढची रिफिल बुक करण्यासाठी ४५ दिवसांची वाट पाहावी लागत होती. LPG पुरवठ्यावर आलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर याआधी हा वेगळा नियम लागू करण्यात आला होता. आता पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामीण ग्राहकांसाठीची ४५ दिवसांची मर्यादा कमी करून २५ दिवस करण्यात आली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी ७ सप्टेंबर रोजी या निर्णयाची माहिती दिली. पेट्रोलियम मंत्रालयाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या तेल विपणन कंपन्यांना नवे नियम तातडीने लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

ग्राहकांना नेमका काय फायदा होणार?

नवीन नियमानुसार शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातल्या घरगुती LPG ग्राहकांना मागच्या रिफिलच्या डिलिव्हरीनंतर २५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर पुढचा सिलिंडर बुक करता येईल. त्यामुळे ग्रामीण ग्राहकांना आधीच्या तुलनेत २० दिवस आधी रिफिल बुक करण्याची सुविधा मिळणार आहे. सरकारने हा निर्णय LPG पुरवठ्याची स्थिती सुधारल्याने आणि रिफिल बॅकलॉगमध्ये मोठी घट झाल्याने घेतल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे सध्या LPG ग्राहकांसाठी बुकिंगच्या नियमांमध्ये शहरी-ग्रामीण असा फरक राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT