Loan Repayment Rules Saam tv
बिझनेस

Loan Recovery Rules: कर्जदाराचा मृत्यू झाल्यास उर्वरित कर्ज कोण फेडणार? गॅरेंटरलाही बसतो फटका; नियम काय सांगतात

Loan Repayment Rule After Death Rules: अनेकजण वेगवेगळे लोन घेतात. दरम्यान, लोन घेतल्यानंतर कर्जदाराचा मृत्यू झाला तर काय होईल, उर्वरित कर्ज कोणाला भरावे लागेल, याबाबतचे सर्व नियम जाणून घ्या.

Siddhi Hande

बँकेच्या कर्जाबाबत महत्त्वाचे नियम

कर्जदाराचा मृत्यू झाल्यास काय होणार?

उर्वरित कर्जाची रक्कम कोण फेडणार?

आयुष्यात कधीही काहीही होऊ शकतं. त्यामुळे अनेकांना भविष्याची काळजी असते. त्यामुळे अनेकजण कर्ज घेऊन घर बांधतात किंवा कार घेतात. याचसोबत अनेकजण पर्सनल लोन घेतात. परंतु जर कर्जदाराचा मृत्यू झाला तर अनेक अडचणी येऊ शकतात. जर कर्जदाराचा मृत्यू झाला तर काय होतो, उर्वरित कर्ज कोण फेडतं, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतात.

कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्ज कोण फेडतं?

जर एखाद्या व्यक्तीने पर्सनल लोन घेतलं असेल आणि को बॅरिअर नसेल तर त्या कर्जदाराच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब कर्ज फेडण्यास बांधील असते. बँक मृत व्यक्तीच्या पतीला किंवा मुलांना स्वतः पैसे देण्यासाठी सक्ती करु शकत नाही. परंतु कर्ज पूर्णपणे माफ होत नाही.

कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी काय करावे?

बँकेला लगेच माहिती द्या

कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याची माहिती लगेच बँकेला द्या. कर्जाची स्थिती समजून घ्या.

माहिती मिळाल्याशिवाय हप्ते भरु नका

बँकेचे लोन नक्की किती आहे, हे कळल्याशिवाय तुम्ही हप्ते भरु नका.सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्यानंतरच कर्ज भरा.

बँक काय करु शकते?

मालमत्तेतून वसुलीचा अधिकार

बँक मृत व्यक्तीच्या मालमत्तेतून कर्जाची रक्कम वसूल करु शकते. यामध्ये मृत व्यक्तीची बचत खाती, मुदत ठेवी, शेअर्स आणि जमीन याद्वारे कर्ज वसूल करु शकतात. जर एखाद्या व्यक्तीकडे १५ लाखांची मालमत्ता असेल आणि त्याचे ५ लाखांचे कर्ज असेल तर ते त्यातून घेतले जाते.

सह कर्जदार किंवा गॅरेंटर असल्यास सावधान

जर दोन व्यक्तींनी एकत्र कर्ज घेतले असेल तर दुसऱ्या जिवंत कर्जदाराला कर्जाचे हप्ते भरावेच लागतात. जर तुम्ही गॅरेंटर असाल तर ही जबाबदारी तुमच्यावर येते.

विम्याचे नियम

कर्ज घेताला जर क्रेडिट लाइफ इन्श्युरन्स घेतला असेल तर कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे. कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर कंपनी उर्वरित रक्कम बँकेला देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT