LIC Saam Tv
बिझनेस

LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् १२००० रुपये पेन्शन मिळवा

LIC Smart Pension Plan: एलआयसी स्मार्ट पेन्शन प्लानमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे. या योजनेत तुम्हाला १२००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार आहे.

Siddhi Hande

भविष्यात कधीच आर्थिक अडचण भासू नये, यासाठी अनेकजण फार आधीपासूनच पैसे वाचवतात. वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. तुम्हाला रिटायरमेंटनंतर दर महिन्याला पेन्शन हवी असेल तर एलआयसीच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करा. एलआयसीच्या स्मार्ट पेन्शन प्लानमध्ये (LIC Smart Pension Plan) गुंतवणूक केल्यावर तुम्हाला १२ हजारांची पेन्शन मिळू शकते.

तुम्ही एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला १२००० रुपयांची पेन्शन मिळू शकते.या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉइंट अकाउंटदेखील उघडू शकतात.

एलआयसी स्मार्ट पेन्शन प्लानचा लाभ भारतीय नागरिक घेऊ शकतात. या योजनेत तुम्ही मंथली, तिमाही आणि सहामाही आधारावर पेन्शन मिळवू शकतात. या योजनेत अॅन्युटीचादेखील लाभ मिळतो.

एलआयसी स्मार्ट पेन्शनमध्ये तुम्हाला कमीत कमी १ लाख रुपये गुंतवायचे आहे. या योजनेत पती आणि पत्नीच्या जॉइंट अकाउंट उघडू शकतात. एलआयसी स्मार्ट पेन्शन योजनेत १ लाखांची गुंतवणूक केली तर १२ हजारांची पेन्शन मिळणार आहे.जर दर महिन्याला पेन्शन हवी असेल तर १००० रुपये मिळतील. तीन महिन्यांनी ३००० रुपये पेन्शन (Pension) मिळेल. वर्षाला तुम्हाला १२ हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळवायची असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करा. या योजनेत गुंतवणूकीवर चांगले व्याजदेखील मिळते. यामुळे वयाच्या ६० वर्षानंतर तुम्हाला पैशांची अडचण येणार नाही.

या योजनेत तुम्हाला एकदा गुंतवणूक करायची आहे. या योजनेत ४० ते ८० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या योजनेत वर्षाला तुम्हाला कमीत कमी १२००० रुपयांची अॅन्युटी खरेदी करावी लागेल. जर या योजनेत ४० वयोगटातील व्यक्तीने ३० लाख रुपये गुंतवले तर त्याला १२००० पेक्षा जास्त रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT