LIC Saral Pension Yojana Saam Tv
बिझनेस

LIC Saral Pension Yojana: LIC ची भन्नाट योजना! निवृत्तीनंतर महिन्याला १२,००० रुपयांची पेन्शन; जाणून घ्या सविस्तर

LIC Saral Pension Yojana For Retired People: सर्वजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करतात. एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला निवृत्तीनंतर आयुष्यभरासाठी पेन्शन मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण निवृत्तीनंतर आपले आयुष्य सुखकर व्हावे, आर्थिकदृष्ट्या कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. एलआयसीच्या सरल पेन्शन प्लानअंतर्गत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळते. (LIC Saral pension Yojana)

एलआयसी सरल पेन्शन योजनेअंतर्गत (LIC Saral Pension Plan)तुम्हाला फक्त एकदा गुंतवणूक करायची असते. त्यानंतर निवृत्तीच्या वयानंतर तुम्हाला दर महिन्याला ठरावीक पेन्शन मिळते. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पीएफ फंडातील किंवा ग्रॅच्युटीचीचे पैसे या योजनेत गुंतवल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

या योजनेत ४० ते ८० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्हाला १००० रुपयांची अॅन्युटी घ्यावी लागणार आहे. ही रक्कम तीन महिन्यांनी ३००० रुपये होईल. तर एका वर्षांनी १२००० रुपयांची अॅन्युटी घ्यावी लागणार आहे.

या योजनेत तुम्हाला वर्षाला कमीत कमी १२००० रुपयांची अॅन्युटी खरेदी करु शकतात. या योजनेत तुम्हीही जास्तीत जास्ती कितीही रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही जेवढी जास्त रक्कम गुंतवणार तेवढी जास्त पेन्शन तुम्हाला मिळणार आहे.

जर ४२ वर्षीय व्यक्तीने या योजनेत ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला आयुष्यभर १२,३८८ रुपयांची पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या भविष्यासाठी ही उत्तम योजना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT