LIC Policy Saam Tv
बिझनेस

LIC Policy: LIC ची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् २८ लाख कमवा

LIC Jeevan Pragati Policy: प्रत्येकजण भविष्यात पैशांची टंचाई भासू नये म्हणून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जर तुम्हालाही तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर एलआयसी जीवन प्रगती पॉलिसीत गुंतवणूक करा.

Siddhi Hande

आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी एफडी, योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. तुम्हालाही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही एलआयसी जीवन प्रगती पॉलिसीमध्ये गुंतवणूक करु शकतात. ही योजना लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी आहे. या योजनेत तुम्ही रोज २०० रुपयांची बचत करुन २८ लाख रुपये मिळवू शकतात.

एलआयसी जीवन प्रगती पॉलिसीमध्ये खूप फायदे मिळतात. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला रिस्क कवरदेखील मिळते.एलआयसीच्या या योजनेत कमीत कमी वयोमर्यादा १२ वर्ष आहे तर जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंतचे नागरिक अर्ज करु शकतात.

भारतीय जीवन विमा निगमच्या या पॉलिसीमध्ये चांगला परतावा मिळतो. त्याचसोबत लाइफटाइम सिक्युरिटीदेखील मिळते. या पॉलिसीत जर तुम्ही दर महिन्याला २०० रुपये गुंतवले तर तुम्ही महिन्याला ६००० रुपये गुंतवतात. याचाच अर्थ तुम्ही वर्षाला ७२,००० रुपये गुंतवतात. त्यामुळे २० वर्षात तुम्ही १४,४०,००० रुपयांची गुंतवणूक करा.या योजनेत सर्व फायदे आणि व्याज मिळते. त्यामुळे तुम्हाला २८ लाख रुपये मिळू शकतात.

एलआयसीच्या या प्लानमध्ये गुंतवणूकदारांचे रिस्क कव्हर ५ वर्षांसाठी वाढते. या पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिट्सदेखील मिळतात. त्यामुळे त्यांना इन्शुरन्सची रक्कन, सिंपल रिवर्सनरी बोनस, फायनल बोनस मिळून पेमेंट दिले जाते. (LIC Jeevan Pragati Policy)

या योजनेतची टर्म कमीत कमी १२ वर्ष आणि जास्तीत २० वर्ष आहे.या योजनेत प्रिमियम तिमाही, सहा महिने आणि वर्षाच्या आधारे दिले जाते. या योजनेत कमीत कमी एश्योर्ड रक्कम १.५ लाख रुपये आहे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT