Ladki Bahin Yojana Update: दिवाळीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना आर्थिक मदतीची गरज आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे मिळून ३,००० रुपये खात्यात जमा होतील, अशी आशा महिलांना आहे. याचसोबत, बंद झालेला १५०० रुपयांचा हप्ता परत सुरू करण्यासाठी व्हॉट्सअॅपवरून अर्ज करता येतो, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. काही मेसेजमध्ये २१०० रुपयांचा हप्ता मिळणार असल्याचंही सांगितलं जातंय. पण या दाव्यांमागचं सत्य जाणून घेणं लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाचं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बंद झालेले पैसे परत सुरू करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर अर्ज भरा, अशा आशयाचे मेसेज प्रसारित होतायेत. मात्र , शासनाच्या स्पष्टीकरणानुसार, बंद झालेले हप्ते सुरू करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर अर्ज स्वीकारण्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे अशा मेसेजच्या लिंकवर क्लिक करण्याआधी त्याची सत्यता तपासणं महत्त्वाचं आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मासिक लाभ १५०० रुपयांवरून २१०० रुपये होणार असल्याचाही दावा केला जातोय. तसेच ५ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी झाल्याचं काही मेसेजमध्ये म्हटलं आहे. पण समोर आलेल्या शासन स्पष्टीकरणानुसार, लाभाची रक्कम वाढवण्याबद्दल असा शासन निर्णय जारी झालेला नाही.
लाभार्थी महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे मिळून ३,००० रुपये दिवाळीआधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पण दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र जमा करण्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे हप्त्याच्या तारखेबाबतच्या चर्चांना निश्चित माहिती समजू नये.
लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होत नसेल तर लाभार्थींनी अधिकृत वेबसाईटवर अर्जाची स्थिती तपासावी. ई-केवायसी पूर्ण आहे का, तसेच अर्ज किंवा लाभासंदर्भात काही सूचना रखडलेल्या आहेत का, हे तपासायला हवं. गरज असेल तर संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.