Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना एप्रिलचा हप्ता आला नाही, मे महिन्यात खात्यात खटाखट ३००० रुपये जमा होणार?

Ladki Bahin Yojana May Month Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हाला मागच्या महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर या महिन्याचा हप्ता मिळणार का?

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत मे महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. मे महिना संपण्यासाठी अवघे १० दिवस उरले आहेत. तरीही लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहि‍णींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला. दरम्यान, काही महिलांना हे पैसे मिळाले नाहीत. जर ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला नाही त्यांना मेचे पैसे येणार का आणि किती येणार असे प्रश्न महिलांच्या मनात आहेत.

या महिलांना मे महिन्यात ३००० रुपये मिळणार (These Women Get 3000 Rupees In May Month)

लाडकी बहीण योजनेत काही महिलांच्या खात्यात एप्रिलचे पैसे जमा झाले नाहीत. त्यांना कदाचित मे महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. ज्या महिला या योजनेतून बाद झाल्या आहेत त्यांना योजनेा हप्ता मिळालेला नाही. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळेदेखील महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. जर तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा झाले नसतील तर त्यांना या महिन्यात पैसे दिले जाणार आहेत.

ज्या महिलांना काही कारणामुळे पैसे मिळाले नाहीत त्यांना या महिन्यात ३००० रुपये दिले जाऊ शकतात. दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात.त्यामुळे या महिलांना मे महिन्यात ३०० रुपये मिळणार आहे.

मे-जूनचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana May-June Installment Come Together)

लाडक्या बहि‍णींना मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. मे महिना संपायला अवघे १० दिवस उरले आहेत. अद्यापही मे महिन्याच्या पैशांबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे कदाचित मे आणि जूनचा हप्ता एकत्र येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

SCROLL FOR NEXT