Ladki Bahin Yojana Update google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : जून महिन्याचा हप्ता या तारखेला होणार जमा; पण 'या'महिलांचे ₹१५०० बंद, मोठी अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana June Installment date Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा ₹१५०० हप्ता १२ ते १५ जुलैदरम्यान जमा होण्याची शक्यता. मात्र ८० लाख महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana June ₹1500 installment date 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. योजनेचा आगामी जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबाबतची उत्सुकता आता संपली असून, लवकरच महिलांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत. मात्र, दुसरीकडे एक धक्कादायक माहितीही समोर आली आहे, ज्यामुळे राज्यातील तब्बल ८० लाख महिलांना मोठा फटका बसणार आहे.

कधी जमा होणार जूनचा हप्ता?

लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा रखडलेला हप्ता १२ ते १५ जुलैदरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. या टप्प्यात राज्यातील सुमारे १ कोटी ६९ लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी १५०० रुपये 'डीबीटी' (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे पाठवले जातील. त्यामुळे कोट्यवधी महिलांना दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर लगेचच निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल.

...पण 'या' ८० लाख महिलांना मिळणार नाही लाभ!

एकीकडे कोट्यवधी महिलांना पैसे मिळणार असतानाच, दुसरीकडे तब्बल ८० लाख महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर या महिलांचा लाभ थांबविण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच विधानसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे की, ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा ज्यांचे अर्ज निकषात बसले नाहीत, त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे.

लाभ बंद होण्याची मुख्य कारणे:

अनेक महिलांनी अद्यापही आपल्या बँक खात्याची आणि अर्जाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

छाननी दरम्यान अनेक महिला योजनेच्या नियमांत आणि अटींमध्ये बसल्या नसल्याने त्या अपात्र ठरल्या आहेत.

छाननी दरम्यान ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आढळले किंवा ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे, असे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

नियमानुसार आता दरवर्षी जून-जुलै महिन्याच्या विंडोमध्ये महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी करून घेणे बंधनकारक असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पावसाने भिंत कोसळली

Konkan Tourism : समुद्रकिनारे, धबधबे अन् तलाव, रिमझिम पावसात कोकणातील 'हे' ठिकाण दिसते लय भारी

Dombivli : डोंबिवलीतील ५० कुटुंबाचे तडकाफडकी स्थलांतर; नेमकं कारण काय? वाचा

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही पावसाचा फटका; घरात साचले पाणी, VIDEO व्हायरल

एकाच कुटुंबातील ५ जण घरातून अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे, पळाले की घातपात? नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT