Ladki Bahin Yojana Saam TV Marathi News
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana Installment Date Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या ₹१,५०० हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात डीबीटीद्वारे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana June installment update : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिला सध्या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जुलै महिन्याचे पहिले १० दिवस उलटून गेले तरीही अद्याप खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा न झाल्यामुळे महिलांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. पण आता या हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Ladki Bahin ₹1500 payment date)

१५ जुलै नंतर खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात महिलांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारकडून लवकरच या योजनेसाठीचा निधी वर्ग केला जाणार असल्याचे समजतेय. त्यानंतर डीबीटी (DBT - Direct Benefit Transfer) द्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील. १५ जुलै रोजी किंवा त्यानंतर हा हप्ता जमा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

१ कोटी ७० लाख महिलांना लाभ; ८० लाख अपात्र

लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे १ कोटी ७० लाख पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. दुसरीकडे, तपासणीत अपात्र ठरलेल्या सुमारे ८० लाख महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जून महिन्याचा हप्ता जमा होण्याच्या तारखेबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा अंतिम अपडेट देण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांनी पुढील काही दिवस अधिकृत माहितीची वाट पाहावी लागणार आहे.

एकत्र ३००० रुपये मिळण्याचीही शक्यता

जर काही कारणास्तव १५ जुलैपर्यंत जून महिन्याचे १५०० रुपये जमा झाले नाहीत, तर महिलांना एकत्र दोन महिन्यांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३,००० रुपये जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: सोलापूर-धुळे महामार्गावर साईभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू,२० जण जखमी

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ जबरदस्त फायदे! हृदयापासून मेंदूपर्यंत होतील मोठे बदल

SCROLL FOR NEXT