Ladki Bahin Yojana ₹3000 payment latest update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेचा पुढील हप्ता येत्या दोन दिवसांत जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीही रक्षाबंधनाच्या सणाच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले होते. यंदाही रक्षाबंधनावेळीच लाडकीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यांचे एकत्र ३,००० रुपये मिळण्याची शक्यता
राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. ऑगस्ट महिना संपण्यासाठी आता अवघा आठवडा उरला आहे. त्यामुळे रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून महायुती सरकार जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्र ३,००० रुपये (दरमहा १५०० रुपये याप्रमाणे) महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची शक्यता आहे. मात्र, खात्यात नक्की १५०० रुपये जमा होणार की ३००० रुपये, याबाबत प्रशासनाकडून अजून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
८० ते ९० लाख महिलांचा लाभ बंद; ई-केवायसी ठरली निर्णायक
लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट अर्जदारांना वगळण्यासाठी सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक केली होती. या पडताळणीनंतर १ कोटी ६५ लाख महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, त्याच वेळी ई-केवायसी आणि इतर निकषांची पूर्तता न करू शकलेल्या तब्बल ८० ते ९० लाख महिलांचा लाभ बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे, त्यांनाच या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे.
बँक खात्यात टप्प्याटप्प्याने जमा होणार रक्कम
पात्र लाभार्थी महिलांची संख्या मोठी असल्याने तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने डीबीटी (DBT) द्वारे पैसे जमा केले जातील. कोणत्याही क्षणी महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. त्यामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही आणि डीबीटी पर्याय सक्रिय आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या महिलांचे अर्ज पात्र आहेत आणि ज्यांची बँक खाती सक्रिय आहेत, त्यांच्यासाठी यंदाची रक्षाबंधन खऱ्या अर्थाने आनंदाची ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.