Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी! लाडकीच्या खात्यात आजपासून ₹ १५०० खटाखट जमा होणार; अजित पवारांची घोषणा

Ladki Bahin Yojana June Month Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आता योजनेचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आजपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली आहे. जूनच्या हप्त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे.

अजित पवारांनी काय म्हटलं? (Ajit Pawar On Ladki Bahin Yojana Installment)

अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या लाडक्या बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून उद्यापासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, अजित पवारांनी माहिती दिली आहे.

लाडकीसाठी ३६०० कोटींचा निधी मंजूर (Ladki bahin yojana june month installment Update)

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आजपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना खूप आनंद झाला आहे.

या महिलांना मिळणार नाही पैसे (These Women Wont Get Money)

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाही आहेत. ज्या महिला निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे.त्यांचे अर्ज आता बाद केले आहेत. प्राप्तिकर विभागाकडून लाडकींच्या उत्पन्नाबाबत माहिती घेतली जात आहे. त्यानंतर ज्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT