Ladki Bahin Yojana installment Date meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana: जुलै - ऑगस्टचे ३,००० रुपये खात्यात कधी जमा होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी ई-केवाईसीवर दिली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana installment Date: लाडकी बहीण योजनेच्या जुलै-ऑगस्ट हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पात्र महिलांना ३००० रुपये मिळण्याची शक्यता असून ई-केवायसी आणि हप्ता वितरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली.

Sakshi Sunil Jadhav

महाराष्ट्रात चर्चेत असलेली माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या महिन्यापासून जुलै-ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार का आणि खात्यात ३००० रुपये कधी जमा होणार, याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतल्या ई-केवायसी प्रक्रियेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जुलै-ऑगस्टच्या हप्त्याची निश्चित तारीख अजून जाहीर केलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांची उत्सुकता आणि चिंता कायम आहे. सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते एकत्रितपणे ३००० रुपये देण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हप्ता उशिरा येण्यामागे स्वातंत्र्यदिनामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय प्रक्रियेचा परिणाम असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. पण याबद्दल अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

ई-केवायसीमुळे अपात्र लाभार्थी वगळले

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी हा महत्त्वाचा मुद्दा होता. योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पडताळणी करणे तातडीने शक्य नव्हते. त्यानंतर सरकारने लाभार्थ्यांची छाननी सुरू केली. नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या व्यक्तींना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या.

राज्यातल्या १ कोटी ६५ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून त्या पात्र लाभार्थी ठरल्या आहेत. पात्र महिलांना नियमितपणे योजनेचा लाभ मिळत असल्याचं मुख्यमंत्र्‍यांनी स्पष्ट केलं.

सरकारी कर्मचारी आणि पुरुषांवर कारवाई

योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाभार्थ्यांच्या कुटुंबांकडून आयकर भरला जात असल्याचं तपासणीत समोर आलं. अशा व्यक्तींची नावं योजनेतून वगळ्यात आली आहेत. याशिवाय काही सरकारी कर्मचारी आणि पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचं आढळलं. त्यांच्यावर कारवाई करून घेतलेली रक्कम वसून केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्‍यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Substitutes: साखरेच्या जागी आजचं खाण्यास सुरुवात करा हे 5 पदार्थ; वजन आणि शुगर दोन्ही राहील कंट्रोलमध्ये

EPFO ची विशेष मोहीम! कर्मचाऱ्यांना मिळणार PF, EPS आणि EDLIचा लाभ, ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घ्या 'हे' काम

Kareena Kapoor : "पागल करते हो तुम लोग"; तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर करीना कपूर खाननं सोडलं मौन, VIDEO समोर

Low blood pressure: अचानक BP लो झालाय? डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरच्या घरी करा हे 5 सोपे उपाय

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

SCROLL FOR NEXT