Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
बिझनेस

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे जमा झाले? मोठी अपडेट

Ladki Bahin August installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पैसे DBT द्वारे खात्यात कसे तपासायचे जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin August installment 1500 rupees payment update : सप्टेंबर महिना संपत आला तरी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा हप्ता खात्यात कधी जमा होणार? असा प्रश्न अनेक महिलांना पडला होता. मात्र, आता राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू असतानाही महिलांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता प्रलंबित होता. त्यामुळे यंदा खात्यात १,५०० रुपये जमा होणार की एकत्र ३,००० रुपये? याबाबत महिलांमध्ये उत्सुकता होती. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

₹१,५०० की ₹३,०००, खात्यात किती पैसे जमा होणार?

लाडक्या बहिणींना सन्माननिधी देण्यासाठी राज्य सरकारकडून २४ तारखेला सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग करण्यात आला. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात ३,००० रुपये जमा होणार नाहीत; कारण राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी हा केवळ एकाच महिन्याच्या हप्त्यापुरता वर्ग केला आहे. त्यामुळे सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा ₹१,५०० रुपयांचाच हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

तुमच्या खात्यात ऑगस्टचा हप्ता जमा झाला का?

ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर 'माझी लाडकी बहीण' योजनेतून अनेक अपात्र महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अर्जांची संख्या जवळपास ९२ लाखांनी कमी झाली आहे. आता टप्प्याटप्प्याने राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे १,५०० रुपये थेट बँक खात्यात (DBT द्वारे) जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पात्र असणाऱ्या सर्व महिलांच्या खात्यात पुढील २ ते ३ दिवसांत ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी वर्ग केला?

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यसाठी राज्य सरकारने २४ सप्टेंबर रोजी जीआर काढला. योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ देण्याकरिता राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा ३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी वितरित केला होता. ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

खात्यात पैसे जमा झाले की नाही, कसे तपासावे?

योजनेचे पैसे DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट लाभार्थी महिलांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातात. पैसे जमा होताच बँकेकडून तुमच्या मोबाईलवर एसएमएस येतो. त्यामुळे आधी तुमच्या मोबाईलमधील Inbox / Messages चेक करा.

'नारी शक्ती दूत' (Nari Shakti Doot) ॲपद्वारे स्टेटस पाहा. मोबाईलमधील Nari Shakti Doot App उघडा आणि लॉगिन करा.'माझे अर्ज' (My Applications) या पर्यायावर क्लिक करा. तुमचा अर्ज Approved दिसत असल्यास बाजूला मिळालेल्या हप्त्यांचे डिटेल्स आणि स्टेटस दिसेल.

GPay, PhonePe, Paytm, BHIM UPI वापरत असाल तर ॲप उघडून 'Check Bank Balance' किंवा 'Transaction History' मध्ये जाऊन १५०० रुपये जमा झाले आहेत का ते तपासा. तुमच्या बँकेच्या मिस्ड कॉल बँकिंग (Missed Call Banking) क्रमांकावर फोन करून किंवा ATM मध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट (Mini Statement) काढूनही खात्यातील शिल्लक तपासता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या ८ महिन्यांत गाशा गुंडाळला

Car washing mistakes: कार धुताना या 5 चुका करणं टाळा

Maharashtra News Live Update: वांद्रे माहीम खाडी परिसरात २२ वर्षीय तरुणाने उडी घेतल्याची घटना

Tea For Diabetes: रोज चहा प्यायल्याने डायबिटीज वाढतो की कमी होतो?

Cancer : धूम्रपान करत नाहीत तरीही होतोय कॅन्सर, महिलांनो तुमच्या घरात दडलंय याचं उत्तर

SCROLL FOR NEXT