Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना e-KYC केली तरीही ₹१५०० कायमचे बंद होणार, नेमकं कारण काय? समोर आली अपडेट

Ladki Bahin Yojana eKYC: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करावी लागणार आहे. केवायसी केल्यानंतर अपात्र महिलांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत केवायसी अनिवार्य

केवायसी न केल्यास बंद होणार लाभ

फक्त पात्र महिलांनाच मिळणार लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या खूप चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. दरम्यान, जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, केवायसी केल्यानंतरही निकषात न बसणाऱ्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहे.

केवायसी न केल्यास लाभ बंद

लाडकी बहीण योजनेत ज्या महिला केवायसी करणार नाही त्यांना लाभ मिळणार नाही. याचसोबत फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थ्यांची नावे आपोआप वगळली जाणार आहे.

अपात्र महिलांना योजनेतून वगळणार (Ladki Bahin Yojana these Women will not get 1500 Rupees)

लाडकी बहीण योजनेत गोपनियता राहण्यासाठी केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान,केवायसी केल्यानंतर ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे.ज्या महिला वयोगटात बसत नाही किंवा ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. त्यामुळे अपात्र असूनही जर तुम्ही केवायसी केली तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे.

कुटुंबाचे उत्पन्न जास्त असल्यास मिळणार नाही लाभ

लाडकी बहीण योजनेत पती आणि वडिलांचीही केवायसी करावी लागणार आहे. यावरुन महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. ईकेवायसी केल्यानंतर सर्व माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाईल.प्राप्तिकर विभागाने पडताळणी केल्यानंतर अपात्र महिलांचा लाभ बंद केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT