Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC करताना चूक झालीये? अशा पद्धतीने करा करा दुरुस्ती, स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki Bahin Yojana KYC One Time Edit: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करताना जर चुक झाली असेल तर दुरुस्त करण्याची संधी तुमच्याकडे असणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीबाबत महत्त्वाची अपडेट

ई केवायसीत चूक झाल्यास अशा पद्धतीने करा दुरुस्त

फक्त एकदाच एडीट करण्याची प्रोसेस

लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. अजूनही लाखो महिलांची केवायसी बाकी आहे. त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. दरम्यान, ज्या महिलांनी केवायसी केली आहे आणि त्यात काही चूक असेल तर त्यांचाही लाभ बंद केला जाऊ शकतो. त्यामुळे या लाभार्थी महिलांना चूक सुधारण्याची एक संधी दिली जाणार आहे. या महिलांना चुक सुधारण्यासाठी वेबसाइटवर नवीन पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे जर तुमचीही केवायसी करताना काही चूक झाली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ती एडीट करु शकतात.

ईकेवायसीत चूक सुधारण्याची प्रोसेस (Ladki Bahin Yojana eKYC one time edit option)

सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला होमपेजवरच ईकेवायसी करताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम येत असल्याने चूक झाल्यास असं लिहलं असेल, त्यावर क्लिक करा.

यानंतर थेट एक लिंक ओपन होणार आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे.

यानंतर तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व योग्य माहिती भरायची आहे.

चुकीची माहिती गेली असेल तर ती एडीट करुन नवीन खरी माहिती भरायची आहे.

यानंतर पुन्हा तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे.

यानंतर तुमचा फॉर्म एडीट होईल.

ईकेवायसीतील चुक सुधारण्यासाठी महत्त्वाची अट (Ladki Bahin Yojana ekyc edit option)

लाडक्या बहि‍णींना ईकेवायसीमध्ये सुधारणा फक्त एकदाच करता येणार आहे. याबाबत वेबसाइटवरदेखील माहिती देण्यात आली आहे. ही एकवेळ सुधारणा करण्याची अंतिम तारीख ३१.१२.२०२५ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला १५ दिवसात हे काम पूर्ण करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT