Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो हे काम करा, अन्यथा ₹ १५०० बंद होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करावेच लागणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी अनिवार्य

महिलांनी करावी लागणार केवायसी

आदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत घोषणा केली आहे. आता महिलांना ई-केवायसी करावे लागणार आहे. ई-केवायसीसाठीची प्रोसेस आता सुरु झाली आहे.

लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य

लाडकी बहीण योजनेत दरवर्षी महिलांची ई-केवायसी (E KYC)केली जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता ही प्रोसेस सुरु करण्यात आली आहे.याबाबत आदिती तटकरेंनी एक्स प्लॅटफॉर्मवरुन माहिती दिली आहे.ई-केवायसी करण्यासाठी दोन महिन्याची मुदतदेखील देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला दोन महिन्याच्या आत हे काम करायचे आहे.

आदिती तटकरेंची घोषणा (Aditi Tatkare Big Annoucement)

आदिती तटकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती.

ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

ई केवायसी म्हणजे काय?

ई केवायसी म्हणजे Know Your Customer. याचाच अर्थ असा की तुमच्या लाभार्थ्यांची माहिती पुन्हा भरणे. पुन्हा एकदा तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. जेणेकरुन तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही हे समजेल. ही प्रोसेस ऑनलाइन असणार आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्यादेखील हे काम करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shegaon Crime : तरुणाला गाडीत डांबून बेदम मारहाण; शेगाव पोलिसांनी भाईगिरी उतरविली, परिसरातून काढली धिंड

Crime News: करवा चौथचा उपवास जोडीनं सोडला; नवऱ्यांना जेवायला दिलं अन् मध्यरात्रीच १२ बायकांनी ठोकली धूम

PF Balance : EPFO बॅलन्स तपासायचा आहे? जाणून घ्या हे 3 सोपे मार्ग

Maharashtra Live News Update: अकोले येथे शेतकरी आक्रमक, तहसिलदारांना घातला घेराव

IND Vs WI Test : वेस्ट इंडिजच्या शेपटाने भारताला झुंजवले! कॅम्बेल, होप यांच्या शतकानंतर १० व्या विकेटच्या जोडीने रडवले

SCROLL FOR NEXT