july installment ladki bahin yojana meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा संपणार! लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसांत पैसे जमा होणार? पण 1500 की 3000 रुपये?

Ladki Bahin July-August Installment Update: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तसेच ३१९.५३ कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

Maharashtra Ladki Bahin Scheme: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातला लाखो महिला अनेक दिवसांपासून जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. येत्या २ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी वर्ग करण्यात आला असून, त्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महिला आणि बाल विकास विभागाला सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल ३१९.५३ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. याबद्दल शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना दिलासा मिळणार आहे.

रक्षाबंधन २८ ऑगस्टला असल्याने त्याआधीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला असतानाही जुलै महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही हप्ते एकत्र येतील, अशा चर्चा सुरू आहेत. महिला आणि बालविकास विभागातले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, फेब्रुवारी २०२५ पासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू करण्यात आली. या प्रक्रीयेत कागदपत्रांची पूर्तता नसलेले अर्ज, बँक खाते लिंक नसलेली खाती तसेच ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थींवर कारवाई करण्यात आली. पडताळणीनंतर ८० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याने त्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत आणि ज्यांची कागदपत्रे, बँक खाते लिंकिंग आणि ई-केवायसी प्रोसेस पूर्ण आहे, त्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मात्र नेमकी रक्कम आणि पैसे जमा होण्याची तारीख सरकारकडून अधिकृतपणे स्पष्ट झाल्यानंतरच निश्चित माहिती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - यंदा महाराष्ट्र केसरी कुस्तीचा महासंग्राम नागपुरात रंगणार

वयाच्या 30 नंतर महिलांचे वजन का वाढते? हे 1 कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Plane Accident News : नवी मुंबईहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात, पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक झाली अन्...

Manoj Jarange : ३ दिवसांत निर्णय न झाल्यास सलाईन-पाणी बंद; जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, नक्की काय म्हणाले?

Dalimbache Fayde: दररोज खा एक वाटी डाळिंब; मिळतील हे 6 चमत्कारिक फायदे

SCROLL FOR NEXT