Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी'चा लाभ, सरकार प्रत्येकी ₹२१००० परत घेणार

Ladki Bahin Yojana 8000 Government Employees Get Benefit: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. आता लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. आता तपासणीत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहेत. आता ही संख्या ८ हजारांवर गेली आहे. ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, आता त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांकडून वसुली करण्याचे आदेश वित्तविभागाने दिले आहे.

लाडकी बहीण योजनेत ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. ही रक्कम जवळपास १५ कोटी आहे. हे पैसे वसूल केला जाणार आहे. या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ घेतला आहे. त्यातील लाखो महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यानंतर त्यांची पडताळणी करण्यात आली. त्यातून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.

८ हजार अंगणवाडी सेविकांकडून १५ कोटी रुपये वसूल केले जाणार आहे. या महिलांनी मागील १ वर्षांपासून दर महिन्याला १५०० रुपयांचा लाभ घेतला आहे. एक वर्ष आणि दोन महिने त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यातून जवळपास त्यांनी २१००० रुपयांचा लाभ घेतला आहे. त्यानंतर आता बोगस लाभार्थ्यांची छाननी सुरु केली आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याबाबत महिला व बालकल्याण विभागाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेत निकषानुसार अडीच लाख उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणा आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांकडून शासनाची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

पगारातून पैसे वळते करणार

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्या वेतनातून हे पैसे वळते केले जाणार आहे. त्यांच्या वेतनातून टप्प्याटप्प्याने पैसे वसूल केले जावेत, यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागासोबत चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer: अचानक ताप अन् थकवा जाणवतो? ही कॅन्सरची लक्षणे नाहीत ना? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

ह्रदयद्रावक! तलावात पोहायला गेलेल्या 4 तरुणांचा बुडून मृत्यू; संभाजीनगरमधील मन हेलावणारी घटना

Political News : महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना भावनिक आवाहन

Baramati By-Election: संजय राऊतांच्या विधानाने सुनेत्रा पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीही पडली बुचकळ्यात, पोटनिवडणुकीवर काय म्हणाले राऊत?

SCROLL FOR NEXT