Ladki Bahin Yojana 
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ५०० की १५००? कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता? जाणून घ्या सर्व माहिती

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी होणार असल्याची चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेत आता ज्या अपात्र महिलांनी लाभ घेतलाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

Bharat Jadhav

राज्यातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी विरोधक वारंवार आमनेसामने येताना दिसतात. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सरकारने २१०० रुपये हप्ता देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. पण हळूहळू ही घोषणा हवेत विरली. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरत सरकार आता लाडक्या बहिणींना ५०० रुपये देणार असल्याचा दावा केलाय. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना किती रुपये मिळणार याबाबत प्रश्न अनेकांना पडलाय.

कोणाला मिळणार पैसा

शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळेल. एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नाहीये. त्या महिलांना योजने अंतर्गत १५०० रुपये दरमहा मिळेल. तर ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत, त्या योजनेची रक्कम १५०० पेक्षा कमी असेल तर त्यांना महिलांना उर्वरित फरकाची रक्कम वितरित करण्यात येत आहे.

तर नमो शेतकरी सन्मान योजनेतून दरमहा १००० रुपये लाभ घेणाऱ्या ७७,४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येतील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी सांगितले होते.

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

दरम्यान, लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येईल, याची प्रतीक्षा आहे. लाडक्या बहिणींना अक्षय्य तृतीयेला महिलांच्या खात्यात पैसे येतील, सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेतील हप्ता कधी मिळेल याबाबत महिलेला प्रश्न पडलाय.नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचाव कार्य पूर्ण

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT