Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana August September installment latest update: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत.

Priya More
  • लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी गुड न्यूज

  • ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार

  • लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये लवकरच खात्यात जमा होणार

  • गौरी आगमनाच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना गणेशोत्सव सणामध्ये सरकार गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. गणेशोत्सवात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. सरकार नेहमीप्रमाणे सणाचे औचित्य साधून लाडकींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची शक्यता आहे. लाडकींना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याचे ३००० रुपये एकत्र मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. लाडक्या बहिणी देखील या दोन्ही हप्त्याचे पैसे येण्याच आतुरतेने वाट पाहत आहेत. पण अद्याप याबाबत सरकारने अधिकृत घोषणा केली नाही.

लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. या आठवड्यात १७ सप्टेंबर रोजी गौरींचं आगमन होणार आहे. याच निमित्ताने राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करु शकतात. राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वितरण प्रक्रिया १६ किंवा १७ सप्टेंबरपासून सुरू केली जाऊ शकते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. फडणवीस सरकारकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण लवकरच याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकारकडून लाडकींच्या खात्यावर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे ३००० रुपये एकाच वेळी खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात. आतापर्यंत सरकारने अनेक वेळा लाडकींच्या खात्यावर एकाचवेळी २ महिन्यांच्या हप्त्याचे पैसे दिल्यामुळे यंदा देखील लाडकींना गणेशोत्सवात ३००० रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. पण सरकार नेमकं एका हप्त्याचे पैसे देणार की दोन हप्त्याचे पैसे देणार हे येत्या २ दिवसांत कळेल. गौरी आगमनाच्या मुहूर्तावर सरकार लाडकींच्या खात्यावर पैसे जमा करून त्यांना खूश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर सरकारने लाडकींच्या खात्यावर जुलै महिन्याचे पैसे जमा केले होते. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. महाराष्ट्र सरकारने २८ जून २०२४ रोजी ही योजना सुरू केली. या योजनेमार्फत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये मदत केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

SCROLL FOR NEXT