Investment In Kisan Vikas Patra saam tv
बिझनेस

Kisan Vikas Patra: दहा लाख रुपये जमा करा अन् मिळवा १० लाख रुपयांचा व्याज; काय आहे सरकारची योजना?

Investment In Kisan Vikas Patra: सध्या या योजनेवर ७.५ टक्के व्याज दिले जाते. किसान विकास पत्र योजनेत एकरकमी गुंतवणूक केली जाते. यामध्ये तुम्ही किमान 1000 रुपये गुंतवू शकता. किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमही तुम्ही गुंतवणू शकतात.

Bharat Jadhav

देशाच्या मुख्य बँका त्यांच्या ग्राहकांना बचत खात्यांसह अनेक जबरदस्त सुविधा देत असतात. यामध्ये अनेक प्रकारच्या बचत योजनांचाही समावेश आहे, त्यात गुंतवणूक करूनही आपण मोठी कमाई करू शकतो. पोस्ट ऑफिसदेखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त योजना आणत असतात. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात बँकांपेक्षा व्याज जास्त देतात, अशीच एक पोस्ट ऑफिसची स्कीम आहे, ज्यात तुम्ही जबरदस्त रिटर्न मिळू शकतात.

सरकारी योजनेवर ७.५ टक्के व्याज

या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव किसान विकास पत्र (KVP) आहे. सध्या या योजनेवर ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. किसान विकास पत्र योजनेत एकरकमी गुंतवणूक केली जाते. यात तुम्ही किमान १००० रुपयांची देखील गुंतवणूक केली जाते. तर जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाहीये. म्हणजेच त्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकतात. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही पैसे गुंतवले असले तरीही मॅच्युरिटीवर तुमचे पैसे थेट दुप्पट होत असतात.

मॅच्युरिटीवर पैसे थेट दुप्पट होतील

किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुमचे पैसे ११५ महिन्यांत म्हणजे ९ वर्षे आणि ७ महिन्यांत दुप्पट होत असतात. जर तुम्ही या योजनेत ५ लाख रुपये जमा केले असतील तर तुम्हाला ५ लाख रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १० लाख रुपये मिळतील. तसेच जर तुम्ही या योजनेत १० लाख रुपये जमा केले असतील तर तुम्हाला १० लाख रुपयांचे थेट व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २० लाख रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historic Places : नर्मदा तटावरील राजेशाही वैभव, 'या' किल्ल्याचे रूपांतर झाले लग्जरी हॉटेलमध्ये, पर्यटकांची होते गर्दी

Bollywood Property: मलाइकाने अलिशान फ्लॅट दिला रेंटवर, इकडे सारा अन् माधुरीनं घर घेतलं भाड्याने, कितीची झाली उलाढाल?

Sonam Kapoor Baby Photo : बाळाला हातात घेताच सोनम कपूर भावुक, अनिल कपूरच्या नातवाची पाहा पहिली झलक

राज्य सरकारचा दिलासा! रेडी रेकनरच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा काय होणार फायदा?

Rule Change From Today: ATM लिमिट ते ट्रेडिंग; आजपासून ४ महत्त्वाचे नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT