Jowar Price Saam Tv
बिझनेस

Jowar Price Decrease: नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! ज्वारीच्या दरात १० ते २० रुपयांनी घसरण; जाणून घ्या भाव

Jowar Price Decrease In Maharashtra: राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील ज्वारीचे दर घसरु लागले आहे. गेल्या काही दिवसांत डाळींचे भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत होते. दरम्यान नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील ज्वारीचे दर घसरु लागले आहे. गेल्या काही दिवसांत डाळींचे भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत होते. दरम्यान नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्यात सर्व बाजारपेठांमध्ये ज्वारीची आवक वाढल्याने हे दर कमी झाले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात ज्वारी ३५ ते ७५ रुपयांना विकली जात होती. आता ज्वारीचे दर घसरले असून २५ ते ५६ रुपये झाले आहेत. ज्वारीचे भाव जवळपास १० ते २० रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याबाबत लोकमत वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

ज्वारीची भाकरी ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खाल्ली जाते. चपातीपेक्षा भाकरी खाणे हे कधीही चांगले असते. परंतु ज्वारीचे दर वाढत असल्याने ग्राहकांना महागाईचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता जवळपास १० ते २० रुपयांनी ज्वारीचे भाव घसरले आहेत.

मागील वर्षी ज्वारीचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे बाजारभाव वाढले होते. परंतु आता बाजारभाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ज्वारीचे भाव घसरण्यास सुरुवात झासी आहे. होलसेल मार्केटमध्ये ज्वारी २५ ते ५६ रुपयांना मिळत आहे. तर किरकोळ मार्केटमध्येही ज्वारी ४० ते ६० रुपयांना मिळत आहे.

राज्यातील वेगवेगळ्या भागातील ज्वारीचे दर

  • सोलापूर- ३३ ते ३५ रुपये

  • धुळे -२० ते ३८ रुपये

  • जळगाव -२७ ते ३४ रुपये

  • सांगली -३१ ते ३४ रुपये

  • नागपूर - ३५ ते ३८ रुपये

  • अमरावती- २५ ते २८ रुपये

  • पुणे -३८ ते ५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शाही मशिदीवरून वाद पेटला; पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक, अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या

Maharashtra News Live Update: निवडणूक आयोगाविरोधात सिंधुदुर्गात काँग्रेसचे तीव्र आंदोलन; राजीनाम्याची मागणी

Car AC mileage: गाडीत AC लावल्याने मायलेज किती कमी होतं?

Pune Crime: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'सोबत भयंकर घडलं, ५ लाखांच्या कारसाठी सासरच्यांकडून छळ

Rakul Preet Singh: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला झटका, आयकर विभागाकडून घरासह १२ ठिकाणी छापेमारी, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT