ITR Filling Saam Tv
बिझनेस

ITR Filling 2026: आयटीआर कधीपासून फाइल करता येणार? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

ITR Filling 2026 Starting Date: करदात्यांना आता आयटीआर फॉर्म कधीपासून भरायचे असा प्रश्न पडला आहे. यासाठी आयटीआर फॉर्म अधिसूचित करण्यात आले आगे. लवकरच फॉर्म भरण्यास सुरुवात केली जाईल.

Siddhi Hande

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी

आयटीआर कधीपासून फाइल करता येणार?

नवीन आयटीआर फॉर्म केले जारी

नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. १ एप्रिलपासून अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. दरम्यान, नवीन आर्थिक सुरु झाल्यानंतर आयटीआर कधीपासून भरायचा असा प्रश्न करदात्यांना पडला आहे. प्रत्येक नवीन आर्थिक वर्षात आयटीआर फाइल करायचा असतो. दरम्यान, आयकर विभागाने २०२६-२७ साठी नवीन आयकर फॉर्म अधिसूचित केले आहे. परंतु हे फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे.

आयटीआर फाइल करण्यास कधीपासून सुरुवात होणार? (ITR Filling Starting Date)

आयकर विभागाने आयटीआरचे फॉर्म जारी केले आहेत. आयटीआर फॉर्म जारी केल्यानंतर लगेचच फॉर्म भरण्यास सुरुवात होते. त्यामुळे या महिन्यापासून आयटीआर भरण्यास सुरुवात होऊ शकते. त्यामुळे कधीही आयकर विभागाकडून फॉर्म भरण्यास सांगितले जाऊ शकते.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटीआर फाइल करण्याची सुरुवात लवकरच होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, आयटीआर दाखल करण्याची प्रोसेस एप्रिलमध्ये सुरु होते. गेल्या वर्षी मात्र आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस खूप उशिरा सुरु झाली होती. आयकर तरतुदींमध्ये झालेल्या बदलांमुळे हा उशिर झाला होता. दरम्यान, या वर्षी आयटीआर फॉर्म भरण्याची सुरुवात याच महिन्यात सुरु होऊ शकते. याबाबत मनी कंट्रोल या वेबसाइटने वृत्त दिलं आहे.

आयकर कायद्यात बदल (Income Tax New Rule)

२०२६-२७ साठी आयकर कायद्यात बदल करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून आयकर कायदा २०२५ लागू झाला आहे. या कायद्याने आयकर कायदा १९६१ची जागा घेतली आहे. दरम्यान, २०२५-२६ साठीचा आयटीआर जुन्या कायद्याअंतर्गतच दाखल केला जाईल. दरवर्षीप्रमाणे आयटीआर फाइल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असेल. याद्वारे तुम्ही आयटीआर १ ते आयटीआर ७ फाइल करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयकडून संशयित विद्यार्थ्यांची चौकशी

Skipping Benefits: वजन कमी करायचंय? मग रोज सकाळी दोरी उड्या मारा, होईल हा बदल

Belapur : हिरव्यागार डोंगरमाथ्यावर वसलाय भव्य किल्ला, पनवेल गाडी पकडा अन् बेलापूरला उतरा

Pregnancy Planning Tips: लवकरच मिळेल गूड न्यूज! बाळासाठी प्रयत्न करताना महिलांनी 'या' १० टिप्स ठेवाव्यात लक्षात

ITR Filing Mistakes: आयटीआर फाइल करताना 'या' चुका कधीच करु नका, अन्यथा भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT