ITR Filing Deadline meta ai
बिझनेस

ITR Filing Deadline: ITR भरण्याची शेवटची तारीख आली काय? उशिर केला तर लागेल ₹5,000 दंड

Income Tax Return : 31 ऑगस्टआधी ITR दाखल करा. मुदत चुकल्यावर उत्पन्नानुसार ५००० पर्यंत लेट फी भरावी लागू शकते. रिफंला उशीर आणि तोटा कॅरी फॉरवर्ड करण्याची संधी गमावू शकता.

Sakshi Sunil Jadhav

करदात्यांसाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ म्हणजेच आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२६ असल्याचं या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे करदात्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत रिटर्न फाइल करणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या दिवसांमध्ये आयकर विभागाच्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढल्यामुळे तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असते.

३१ ऑगस्टनंतर आयटीआर फाईल केल्याने उशीर रिटर्न म्हणजेच Belated ITR भरावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आयकर कायद्याच्या कलम २३४एफ अंतर्गत फी भरावी लागू शकते. ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी ही रक्कम १००० रुपये असू शकते. टॅक्स थकलेला असल्यास उशीर झाल्यामुळे जास्त व्याजही लागू होऊ शकतं.

ITR उशिरा भरल्याने फक्त दंडाचा फटका बसत नाही, तर काही इतर अडचणीही निर्माण होऊ शकतात. कर परतावा म्हणजेच Tax Refund मिळाल्यावर उशीर होऊ शकतो. तसेच शेअर बाजार, F&O किंवा व्यवसायातून झालेला काही तोटा पुढच्या आर्थिक वर्षांमध्ये Carry Forward करण्याची संधी गमावली जाऊ शकते.

होम लोन, कार लोन किंवा व्हिसासाठी ITR गरजेचा असेल तर वेळेवर रिटर्न दाखल केलेला असणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे करदात्यांनी आपले AIS आणि TIS तपासून उत्पन्न, व्याज, डिव्हिडंड आणि शेअर ट्रेडिंगची माहिती योग्य असल्याची खात्री करावी. आपल्या उत्पन्नानुसार योग्य ITR फॉर्म निवडणंही महत्त्वाचं आहे.

ITR दाखल केल्यानंतर e-Verification करणं विसरू नका. रिटर्नची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ठरलेल्या कालावधीत ई- व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची घाई टाळून करदात्यांनी आपला ITR लवकरात लवकर दाखल करणं योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गणेशोत्सवात डीजेमधील प्लाझ्मा आणि प्रेशर मिडला बंदी

Rahul Gandhi Today Live : राहुल गांधी पुणे विमानतळावर दाखल

WhatsApp storage full: WhatsApp मुळे फोनचं स्टोरेज भरलंय? आता चॅट्स डिलीट न करता फक्त या सेटिंगच्या मदतीने रिकामी करा स्टोरेज

Telangana CM : मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार, जमीन घोटाळाप्रकरणी तक्रार, तेलंगणाच्या राजकारणात खळबळ

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा! जन्मदात्याकडून दोन मुलींवर अत्याचार

SCROLL FOR NEXT