Income Tax Return google
बिझनेस

ITR Filing 2026-27: ITR भरताना कर्ज, वारसा हक्कातून मिळालेले पैसे दाखवावे लागतील का? नवीन नियम सोप्या भाषेत समजून घ्या

Income Tax Return : आयटीआर फायलिंग २०२६-२७ मध्ये 'Receipts Not in the Nature of Income' हा नवीन विभाग जोडला आहे. कर्ज, वारसा हक्कातून मिळालेली रक्कम आणि काही भेटवस्तूंची माहिती द्यावी लागेल. पण त्यावर कर लागणार नाही.

Sakshi Sunil Jadhav

आर्थिक वर्ष २०२६ - २७ साठी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यंदा आयकर विभागाने ई-फायलिंग पोर्टलवर एक महत्त्वाचा बदल केलेला आहे. आता ऑनलाइन ITR भरताना 'Receipts Not in the Nature of Income' नावाचा नवीन विभाग जोडला आहे. या बदलामुळे अनेक करदात्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, कर्ज, वारसा हक्कातून मिळालेले पैसे किंवा नातेवाईकांकडून मिळालेली रक्कमही ITR मध्ये नमूद करावी लागणार का? असा प्रश्न पडलेला आहे. पुढील माहितीत यासंदर्भात जाणून घेऊयात.

तर कर्ज, वारसा हक्कातून मिळालेले पैसे किंवा नातेवाईकांकडून मिळालेली रक्कमही ITR मध्ये नमूद करावी लागते. याचा अर्थ या रकमेवर कर भरावा लागेल, असा अजिबात नाही. या नव्या विभागात अशा रकमेची माहिती द्यावी लागेल, जी तुमचं उत्पन्न मानली जात नाही. उदा. क किंवा इतर संस्थेकडून घेतलेले कर्ज, वारसा हक्कातून मिळालेली मालमत्ता किंवा रक्कम, काही विशिष्ट नातेवाईकांकडून मिळालेली आर्थिक मदत किंवा भेटवस्तू अशा व्यवहारांचा यात समावेश होऊ शकतो.

आयकर विभागाने हा बदल आर्थिक व्यवहार जास्त पारदर्शक करण्यासाठी केला आहे. त्यामुळे भविष्यात तुमच्या बँका व्यवहारांमध्ये किंवा मोठ्या रकमेबाबत शंका निर्माण झाल्याने त्याचे स्पष्टीकरण देणं सोपं जाईल.

महत्त्वाची बाब म्हणजे, हा नवीन विभाग सध्या फक्त ऑनलाइन ई-फायलिंग पोर्टल आणि ऑफलाइन JSON युटिलिटीमध्ये उपलब्ध आहे. अधिकृत ITR फॉर्मच्या PDF आवृत्तीत हा कॉलम दिसणार नाही. त्यामुळे ऑनलाइन रिटर्न भरताना तुम्हाला हा ऑप्शन दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT