Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आईपण भारी देवा! प्रेग्नंट असताना दिली स्पर्धा परीक्षा, पहिल्याच प्रयत्नात IPS; शहनाज इलियास यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story OF IPS Shahnaz Illyas: आयपीएस शहनाज इलियास यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी प्रेग्नंट असताना स्पर्धा परीक्षा दिली होती.

Siddhi Hande

महिला या कोणत्याची क्षेत्रात मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपले नाव कमावले आहे. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस किंवा आयपीएस ऑफिसर होण्यामध्येही महिला आघाडीवर आहेत. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव कमावले आहेत.असंच यश शहनाज इलियास यांनीदेखील मिळवलं आहे. त्यांनी प्रेग्नंट असताना यूपीएससी परीक्षा दिली आणि पासदेखील केली. त्या आज आयपीएस अधिकारी आहेत.

शहनाज इलियास यांचा प्रवास (IPS Shehnaaz illyas Journey)

शहनाज इलियास या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांनी तमिळनाडूमधून आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज झाल्यानंतर त्यांनी ५ वर्षांपर्यंत आयटी कंपनीत काम केले. या काळात त्यांनी रेग्युलर ९ ते ५ नोकरी केली. प्रायव्हेट नोकरी करताना त्यांच्या मनात अचानक सरकारी अधिकारी होण्याचा विचार आला. समाजात बदल करण्यासाठी काहीतरी करावे, असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

प्रेग्नंट असताना दिली परीक्षा (Give UPSC IN Pregnancy)

शहनाज इलियास यांनी आपल्या मॅटरनिटी लिव्हचा उपयोग खूप चांगला केला. त्यांनी सेल्फ स्टडी करुन तमिळनाडू लोक सेवा आयोग परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांच्याकडे दोन महिन्याचा कालावधी होता. या काळात त्यांनी खूप मेहनत केली.

मिडिया रिपोर्टनुसार, प्रेग्नेंट असताना ९व्या महिन्यात त्यांनी ही परीक्षा दिली. आणि पहिल्याच प्रयत्नात तामिळनाडू लोक सेवा आयोगाची परीक्षा पास केली.

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक

दोन महिन्यात तयारी करुन त्यांनी प्रिलियम्स परीक्षा पास केली. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत त्यांची डिलिव्हरी झाली होती. यावेळी त्यांनी आपल्या मुलीचा सांभाळ करता करता यूपीएससी परीक्षेची तयापी केली.

शहनाज इलियास यांनी मेहनतीने हे यश मिळवले. त्यांनी २०२० मध्ये २१७ रँक प्राप्त केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा क्रॅक केली. त्या आता आयपीएस पदावर कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT