IPHONE 18 PRICE saam tv
बिझनेस

साडेचार लाखांचा आयफोन भारतात, कारच्या किंमतीत फोन, तरीही खरेदीसाठी झुंबड

iPhone 18 Foldable Priced at Rs 4.5 Lakh: आयफोन 18 लॉन्च झाल्यानंतर आता iphoneच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड पाहायला मिळतेय...मात्र आयफोन 18च्या किंमतीत दैनंदिन वापरातील कोणत्या वस्तु तुम्ही विकत घेऊ शकता...पाहूयात या रिपोर्टमधून....

Snehil Shivaji

बहुप्रतिक्षित आयफोन अखेर भारतात आला. आजवर आयफोनचा नवा व्हेरियंट बाजारात आल्यानंतर आपसूकच जुन्या व्हेरियंटच्या आयफोनच्या किंमती कमी व्हायच्या. परंतु यावेळी आयफोनची किंमत तर साडेचार लाख झालीच पण आयफोन 17ची किंमत पण वाढवली. यामुळे यंदा आयफोनकडे आयफोनप्रेमी पाठ फिरवतील अशी चर्चा असतांनाच शुक्रवारी काय चित्र दिसलं पाहा..

मुंबईत नुकतंच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लोकांनी आदल्या दिवसापासून रांगा लावल्या होत्या. पण आता याच मुंबईच्या बीकेसीत आदल्या दिवसापासून आयफोन प्रेमी नवा व्हेरिंयटचा हा आय़फोन खरेदी करण्यासाठी रात्रभर रांगेत उभे होते. होय.. रात्रभर हे लोकं इथे आय़फोन स्टोर कधी उघडतं यासाठी डोळे लावून बसले होते..

आयफोन १८ च्या फोल्डेबल टॉप मॉडेलची किंमत अनेक कार्सच्या बरोबरीनं आहे. एका आयफोन - १८ च्या किमतीत काय काय येवू शकतं ते पाहूयात...

Suzukiच्या Alto K10, S-Presso येतील

Royal Enfield Bullet 350 तर तुम्ही अगदी सहज एक नव्हे तर दोन दोन घेऊ शकता, अँक्टिव्हा स्कूटी तर तुम्ही एक दोन नाही ५-५ घेऊ शकता. महागाईतही तुम्ही किमान ३०-३१ ग्रँम सोनं देखिल सहज खरेदी करु शकता. आणि जर तुम्हाला याच किंमतीत जागा हवी असेल तर तिसरी मुंबई असो की कुठल्याही ग्रामिण भागात तुम्ही काही गुंठे जागाही खरेदी करु शकता. पुर्ण घरातील इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस म्हणजेच फ्रीज, मोठा टिव्ही, मोठं कपाट, ओव्हन, एसी असं सगळं घर खर्चाचं सामानही तुम्ही सहजच खरेदी करु शकता

आयफोन आल्यानंतर तो महाग आहे म्हणून लोकं खरेदी करणार नाही हा समज पहिल्याच दिवशी खोटा ठरला. अजूनही लोकांनी आयफोन स्टोर्सच्या बाहेर गर्दी केलीये. किंमत किती ही असो जे आय़फोन प्रेमी आहेत त्यांना आयफोन हवाच. त्यामुळे या पैशांत काय येईल काय होईल याचा विचार न करता लोकं ईएमआयवर का होईना पण आयफोन हवाच हीच क्रेज दिसली. त्यामुळे या पैशांत घर बनवतं की गाडी येते, याचा हिशोब मांडणाऱ्यांना आयफोनप्रेमींनी एकाच वाक्यात उत्तर दिलंय... हौसेला मोल नाही, अन् आयफोनला पर्याय नाही!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT