LIC Aadhaar Shila Plan Explained in Marathi  LIC Aadhaar Shila Plan Explained in Marathi - Saam TV
बिझनेस

LIC Aadhaar Shila Plan: एलआयसीची महिलांसाठी खास योजना, रोज ५८ रुपये गुंतवून जमवा ८ लाख रुपये

LIC Aadhaar Shila Scheme: एलआयसी आधार शिला योजना ही एक नॉन-लिंक्ड, जीवन विमा योजना आहे. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात.

प्रविण वाकचौरे

LIC Investment Scheme:

सर्वसामान्यांनासाठी LIC हे हक्काचं गुंतवणुकीचं साधन आहे. एलआयसीदेखील विविध उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना घेऊन येते. एलआयसीच्या महिलांसाठी देखील काही खास योजना आहेत. त्यातील एक योजना म्हणजे LIC आधार शिला योजना. या योजनेचं खास वैशिष्ट्य असं की दररोज अवघ्या 58 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभारली जाऊ शकते.

LIC आधार शिला योजना ही एक नॉन-लिंक्ड, जीवन विमा योजना आहे. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. या पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला निश्चित रक्कम मिळते. जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण गुंतवणूक करू शकतं?

आधार कार्डधारक प्रत्येक महिला या योजनेत गुंतवणूक करू शकते. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलेचे वय 8 ते 55 वर्षे दरम्यान असावे लागते. तुम्ही ही पॉलिसी 10 वर्षे ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी करू शकता. मॅच्युरिटीच्या वेळी महिलेचे कमाल वय 70 वर्षे असू शकते. या योजनेत तुम्हाला 2 लाखांपासून कमाल 5 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळू शकते. (Latest Marathi News)

8 लाख रुपये कसे मिळवायचे?

जर तुम्ही दररोज 58 रुपये गुंतवले तर या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी लाखो रुपये मिळतील. तुम्ही तुमची प्रीमियम रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भरू शकता. समजा सध्या तुमचे वय 20 वर्षे आहे.

आजपासून तुम्ही दररोज 58 रुपये जमा केल्यास म्हणजेच या योजनेत गुंतवणूक केल्यास, वार्षिक आधारावर तुम्हाला 21,918 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल. तुम्ही त्यात सतत 20 वर्षे गुंतवणूक केल्यास, तुमची विमा रक्कम 4,29,392 रुपये असेल. अशा प्रकारे, जेव्हा पॉलिसी 20 वर्षांनी मॅच्युअर होईल तेव्हा तुम्हाला 7,94,000 रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

SCROLL FOR NEXT