SIP Investment Saam TV
बिझनेस

SIP Investment: फक्त १००० रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हीही करोडपती होऊ शकता! वाचा SIP चा तगडा फॉर्म्युला

गुंतवणुकीसाठी अशा काही स्किम आहेत ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही करोडपती सुद्धा होऊ शकता.

Ruchika Jadhav

Mutual Fund Investment: आपण श्रीमंत असावं, भरपूर संपत्ती कमवावी असं स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो. त्यासाठी सर्वसामान्य माणसं आपल्या रोजच्या किंवा महिन्याच्या कमाईतून काही टक्के रक्कम बाजूला काढतात. सेवींग केलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्यातून मोठी रक्कम परत मिळवता येते. गुंतवणुकीसाठी अशा काही स्किम आहेत ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही करोडपती सुद्धा होऊ शकता. (Latest Marathi News)

गुंतवणूकीसाठी एसआयपी लोकप्रिय

कोट्याधीश व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टींवर विशेष लक्ष द्यावं लागेल. पहिले म्हणजे तुमचे जितके उत्पन्न आहे त्यातीत काही रक्कम बचत करणे आणि दुसरे म्हणजे साठवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे. यासाठी तुम्ही SIP ची निवड करु शकता. एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम मार्ग आहे.

यामध्ये छोट्या गुंतवणुकीमधून तुम्ही मोठी रक्कम परत मिळवू शकता. यासाठी सुरुवातीला फक्त १००० रुपयांची गुंतवणूक देखील करता येईल. दर महा एक हजार रुपये भरुन तुम्ही १ नाही तर २ कोटींपर्यंत सुद्ध नफा कमवू शकता.

गुंतवणूक दीर्घकाळासाठी करा

जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय निवडा. दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने तुम्हाला सर्वोत्कृष्ट परतावा मिळेल. ही गुंतवणूक तुम्ही फार कमी वयात करायला हवी. तरुणपणीच गुंतवणूक केल्यास त्यातून जास्त नफा मिळेल असं तज्ज्ञ सांगतात.

१००० रुपये गुंतवणुकीत कोटींचा परतावा

दर महा १००० रुपये गुंतवणूक करताना तुम्ही ते म्युच्युअल फंड एसआयपी करा. गेल्या काही वर्षांतील एसआयपीचे परतावे वाढले आहेत. यात अनेकांना २० टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल. सलग ३० वर्षे ही गुंतवणूक सुरू ठेवल्यास तुमच्याकडे २ कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा होईल.

उदाहरणाद्वारे समजून घेऊ

जर दरमहा १००० रुपये गुंतवले तर ३० वर्षांत तुमचे ३,६०,००० रुपये जमा होतील. यात २० टक्क्यांपर्यंत परतावा मिळवला तर तुमचा फंड २,३३,६०,००० रुपये इतका होईल. चक्रवाढ व्याज लागल्याने तुम्हाला जास्त रकमेचा परतावा मिळण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT