Daal Price Hike Saam Tv
बिझनेस

Daal Price Hike : डाळींच्या किंमतीत वाढ, सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा झटका

Prices Of Daal : डाळींच्या दरात प्रति किलो वीस रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कांदा, टोमॅटोचे दर वाढले असताना अशातच डाळींच्या किमतीत देखील वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Inflation :

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. वाढत्या किंमतीमुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी देखील आता अधिक पैसे मोजावे लागतील का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलिंडरच्या भावानंतर डाळींच्या (Pulses) किमतीत देखील वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे गृहिणीचं बजेट कोलमडलं आहे. डाळींच्या दरात प्रति किलो वीस रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कांदा, टोमॅटोचे दर वाढले असताना अशातच डाळींच्या किमतीत देखील वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात डाळीचे दर वाढले असून प्रति किलो मागे दहा ते वीस रुपयांनी (Price) वाढ झाली आहे. डाळीचे दर वाढल्याने खरेदीचा कल देखील कमी झाला आहे. येत्या काळात डाळीचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडला आहे.

दरम्यान दुसरीकडे किरकोळ बाजारात कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलो पन्नास ते साठ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर टोमॅटोचे दर प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये इतके सध्या आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाला (Vegetable) देखील महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT