8th Pay Commission meta ai
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच HRA मध्येही मोठा बदल

8th Pay Commission HRA : आठव्या वेतन आयोगानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. Level-7 कर्मचाऱ्यांना X शहरात अंदाजानुसार ₹४०,४१० HRA मिळू शकतो, मात्र अंतिम निर्णय सरकारच घेईल.

Sakshi Sunil Jadhav

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच HRA मध्येही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर वाढल्यावर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी वाढेल आणि त्याचा परिणाम HRA वरही होऊ शकतो. विशेष म्हणजे X कॅटेगरीतल्या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा जास्त फायदा मिळण्याची शक्यता आहे.

HRA कसा ठरतो?

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा HRA त्यांच्या बेसिक सॅलरिच्या ठराविक टक्केवारीनुसार ठरवला जातो. कर्मचाऱ्याच्या पोस्टिंगच्या शहरानुसार X, Y आणि Z अशा तीन श्रेणी आहेत. सध्या X शहरांसाठी ३० टक्के, Y शहरांसाठी २० टक्के आणि Z शहरांसाठी १० टक्के HRA दिला जातो. तर X श्रेणीमध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकात्ता, मुंबई, पुणे या शहरांचा समावेश आहे.

लेव्हल ७ च्या कर्मचाऱ्यांचे गणित

लेव्हल ७ च्या कर्मचाऱ्यांचा सध्याचा बेसिक पगार ४४,९०० गृहीत धरला आहे. जर ३ पट फिटमेंट फॅक्टर लागू झाला आणि बेसिक पे १,३४,७०० झाला, तर X शहरात ३० टकके HRA म्हणजे ४०,४१०, Y शहरात २६,९४० आणि Z शहरात १३,४७० रुपये मिळू शकतात.

२.५ पट फिटमेंट फॅक्टर गृहीत धरल्याने बेसिक पे १,४०,२५० रुपये मानला आहे. त्यानुसार HRA अनुक्रमे ₹३३,६७५, ₹२२,४५० आणि ११,२२५ होऊ शकतो. तर २ पट फिटमेंट फॅक्टर असल्यास बेसिक पे ₹८९,८०० गृहीत धरल्यावर X, Y आणि Z शहरांसाठी HRA अनुक्रमे

तर 2 पट फिटमेंट फॅक्टर असल्यास बेसिक पे ₹89,800 गृहीत धरल्यावर X, Y आणि Z शहरांसाठी HRA अनुक्रमे ₹२६,९४०, ₹१७,९६० आणि ₹८,९८० इतका होऊ शकतो.

अंतिम निर्णय महत्त्वाचा

हे सर्व आकडे अंदाज आणि उदाहरण म्हणून पाहावे लागतील. आठव्या वेतन आयोगाचा अंतिम फिटमेंट फॅक्टर, नवीन बेसिक पे आणि HRA चे दर सरकारच्या निर्णयानंतर निश्चित होतील. त्यामुळे सध्या ₹४०,४१० HRA मिळेल असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. फिटमेंट फॅक्टर वाढल्याने मात्र बेसिक पे वाढून HRA मध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनसेचा मेळावा; राज ठाकरे DJवर बोलणार?

Bread-Omelette : नाश्त्यात रोज ब्रेड-ऑम्लेट खाणं आरोग्यासाठी चांगलं की धोकादायक? आताच जाणून घ्या

Birthday Gift for Girlfriend: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला द्या सरप्राईज गिफ्ट; 'ती' होईल खुपच खूश

Palghar : शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखासह ११ जणांवर गुन्हा, पालघरमध्ये हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण भोवलं

Liquor Tragedy : धक्कादायक बातमी! विषारी दारूमुळे मोठा अनर्थ; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT