Honor Magic V3  Saam TV
बिझनेस

Honor Magic V3, Vs3 फोल्डेबल स्मार्टफोन सॅटेलाइटसह लॉन्च, जाणून घ्या किंमत

साम टिव्ही ब्युरो

प्रसिद्ध फोन उत्पादक कंपनी Honor ने चीनमध्ये Magic V3 आणि Magic Vs3 फोल्डेबल फोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोल्डेबल फोन मजबूत फीचर्ससह येतात. Honor Magic V3 आणि Vs3 फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये सॅटेलाइट फीचर, 50MP कॅमेरा आणि बरेच काही ग्राहकांना मिळणार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Honor Magic V3 स्पेसिफिकेशन

Honor Magic V3 फोल्ड केल्यावर 9.2mm आणि उघडल्यावर 4.35mm पातळ आहे. यात 20:9 आस्पेक्ट रेशोसह 6.43-इंचाची बाहेरील स्क्रीन, 2376 x 1060 पिक्सेलचे रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 5000 nits पीक ब्राइटनेस आणि 4320Hz PWM डीमींग आहे.

याच्या आतील LTPO OLED पॅनेलचा आकार 7.92- इंच आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz असून याचा डिस्प्ले 2344 x 2156 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. दोन्ही डिस्प्ले 10-बिट कलर डेप्थ पर्यंत सपोर्ट करतो.

परफॉर्मन्ससाठी यात स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 चिपसेट आहे. फोन Android 14-आधारित Magic OS 8.0.1 बूट करतो. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात ट्रिपल कॅमेरा आहे/. ज्यामध्ये OIS सह 50MP f/1.6 प्रायमरी सेन्सर, ऑटोफोकस आणि मॅक्रो मोड सपोर्टसह 40MP f/2.2 अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. याव्यतिरिक्त यात 20MP f/2.2 शूटर्सची देण्यात आला आहे.

Honor Magic V3 ची चीनमध्ये 12GB/256GB व्हेरिएंटसाठी CNY 8,999 (अंदाजे 1,03,600 रुपये), 16GB/512GB व्हेरिएंटसाठी CNY 9,999 (अंदाजे 1,15,100 रुपये) आणि 1TB स्टोरेजसह 16GB रॅम व्हेरिएंटची किंमत CNY 10,999 (अंदाजे 1,26,600 रुपये) आहे.

Honor Magic Vs3 स्पेसिफिकेशन

Honor Magic Vs3 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 चिपसेट आहे. यात 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे. यात ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये OIS सह 50MP f/1.9 प्रायमरी सेन्सर, ऑटोफोकस आणि मॅक्रो मोड सपोर्टसह 40MP f/2.2 अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूम आणि f/3.4 अपर्चरसह 8MP कॅमेरा ग्राहकांना मिळतो. याव्यतिरिक्त यात आतील आणि बाहेरील स्क्रीनवर 16MP f/2.2 कॅमेरा देण्यात आला आहे.

Honor Magic Vs3 ची किंमत 12GB/ 256GB व्हेरिएंटसाठी CNY 6,999 (अंदाजे 80,600 रुपये) आहे. 12GB/512GB आणि 16GB/1TB कॉन्फिगरेशनची किंमत अनुक्रमे CNY 7,699 (अंदाजे 88,600 रुपये) आणि CNY 8,699 (अंदाजे 1,00,100 रुपये) आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मी निवडणूक लढण्यावर ठाम - माजी पोलीस आयुक्त संजय पांडे

IND vs BAN 1st Test: जडेजा अन् अश्विनच्या जोडीने रचला इतिहास! मोडून काढला 15 वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड

Maharashtra Politics: कन्फर्म! विधानसभेआधीच महायुतीला जबरा झटका, सत्तानाट्यातील महत्वाच्या मोहऱ्यानं मांडली वेगळी चूल

Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपचार घेण्यास नकार

MVA Meeting : जागावाटपाबाबत मविआची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT