Home Loan EMI  Saam Tv
बिझनेस

EMI Loan : कर्जाचा हप्ता फेडताना नाकीनऊ येताय? या 4 टिप्स फॉलो करा, लवकरच होईल कर्जातून मुक्ती

Home Loan EMI : बरेचदा कर्ज घेतल्यानंतर त्याचे हप्ते फेडताना आपल्या नाकी नऊ येतात. ज्यामुळे EMI भरण्यास उशीर होतो.

कोमल दामुद्रे

EMI Loan Tips :

घरच्या वाढत्या किमती पाहाता घर खरेदी करताना आपल्या डोक्यात सगळ्यात आधी विचार येतो तो कर्ज घेण्याचा. हल्ली बँका देखील कर्ज सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध करुन देतात.

जर आपला क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कोणत्याही बँकेतून आपल्याला सहज लोन मिळते. परंतु, बरेचदा कर्ज घेतल्यानंतर त्याचे हप्ते फेडताना आपल्या नाकी नऊ येतात. ज्यामुळे EMI भरण्यास उशीर होतो. अशावेळी EMI साठी अधिक पैसे भरावे लागतात. त्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही कर्जाच्या झंझटीतून लवकरच मुक्त व्हाल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मॅनेजरला पूर्व सूचना द्या

तुमचा ईएमआयचा (EMI) हप्ता चुकणार असेल किंवा पैसे भरण्यास उशीर होणार असेल तर बँकेच्या मॅनेजराला याची पूर्वकल्पना द्या. ज्यामुळे तुमचा होल्डसाठीही अर्ज करु शकता.

2. कर्जाची पुनर्रचना

कर्ज घेताना तुमची आर्थिक (Money) स्थिती पूर्वी सारखी नसेल तर कर्जाचे पुनर्गठन करणे चांगला पर्याय आहे. त्याच्या मदतीने तुम्ही कर्जाचा सध्याचा EMI कमी करु शकता. तसेच कर्जाचा हप्ता देखील वाढवू शकता.

3. थकबाकी EMI निवडा

ज्यावेळी कर्ज (Loan) घेतले जाते, तेव्हा बँकेकडून महिन्याच्या सुरुवातीला EMI कट केला जातो. त्याला आगाऊ EMI असे म्हटले जाते. थकबाकी EMI अंतर्गत, पैसे महिन्याच्या शेवटी कापले जातात. यामुळे तुम्हाला थकबाकी EMI मध्ये पैसे जमा करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

4. क्रेडिट अहवाल

ईएमआयची परतफेड करण्यास उशीर करता तेव्हा बँकेकडून क्रेडिट ब्युरोला याची माहिती दिली जाते. तुम्ही EMI भरणार नाही तेव्हा बँकेशी बोला. यासाठी तुम्ही क्रेडिट रिपोर्टमध्ये ईएमआयचा अहवाल न देण्याची विनंती देखील करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT