Health insurance claim process becomes easier as IRDAI removes 24-hour hospitalization requirement saam tv
बिझनेस

मेडिक्लेममधील काढली अट, रुग्णांची मिटली कटकट, केवळ 2 तास उपचार, तरी मेडिक्लेम मिळणार

IRDAI Updates Rules: तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स काढला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.. हेल्थ इन्शुरन्स क्लेम करताना येणाऱ्या अडचणी आता निकाली लागणार आहे... भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं बदलेल्या नियमांमुळे विमाधारकांना कसा फायदा होणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

वाढते हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम आणि गरजेच्या वेळी कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईपासून सर्वसामान्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता विमा क्लेम मिळवण्यासाठी तुम्हाला रुग्णालयात 24 तास भरती राहण्याची सक्ती नसणार आहे. नव्या नियमांनुसार आता फक्त 2 तास जरी रुग्णालयात तुम्ही उपचार घेतले तरीही तुम्हाला विम्याचे पैसे मिळणार आहेत. मात्र, याकरिता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा(IRDAI)च्या काय अटी आहेत पाहूयात....

केवळ 2 तास उपचार, मेडिक्लेम होणार

पॅनलमधील रुग्णालयाची निवड करा

भरती होताच इन्शुरन्स कंपनीला कळवा

कंपनीकडून प्री-ऑथोरायझेशन मंजुरी आधीच मिळवा

डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन आणि केसपेपर जपून ठेवा

डिस्चार्ज समरीसह सर्व बिलं सादर करा

खरंतर, अपघात झाल्यास किंवा गंभीर आजार जडल्यास उपचार घेण्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स असल्यानं पुष्कळ फायदा होतो. मात्र, छोट्या-मोठ्या उपचारांसाठी आरोग्य विम्याचा लाभ घेता येत नाही. आता बदललेल्या नियमामुळे झटपट उपचारांसाठीही लाभ घेता येणार असल्यानं सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT