HDFC Bank  Saam Tv
बिझनेस

होम लोन, कार लोन झालं स्वस्त; नवरात्रीआधी 'या' बँकेने घेतला मोठा निर्णय

HDFC Bank Reduces Interest Rate: एचडीएफसी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेने कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. एमसीएलआर रेट ०.५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे.

Siddhi Hande

HDFC बँकेचा मोठा निर्णय

कर्जावरील व्याजदर केले कमी

०.५ बेसिस पॉइंट्सने व्यादजर होणार कमी

देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक म्हणजे एचडीएफसी. एचडीएफसी बँकेने ग्राहकांना खुशखबर दिली आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. काही ठरावीक कर्जावरील एमसीएलआर रेट ५ बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना खूप फायदा होणार आहे. यामुळे नवीन कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. एमसीएलआरमध्ये कपात झाल्यावर तुमच्या व्याजदरातदेखील बदल होणार आहे.

एचडीएफसी बँकेचे हे नवीन व्याजदर ८ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. यामध्ये ६ महिन्यांपासून ते १ वर्षांपर्यंतचे एमसीएलआर रेट ५ बेसिस पॉइंट्सने कमी झाले आहे. हे दर आधी ८.७० टक्के होते. ते आता ८.६५ टक्के झाले आहे.

दोन वर्षांसाठी कालावधीच्या लोनवरीलदेखील व्याजदर कमी झाले आहे. हे दर ८.७५ वरुन ८.७० टक्के होणार आहे. परंतु एका दिवसासाठी, एका महिन्यासाठी किंवा ३ महिन्यांसाठी घेतलेल्या लोनवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. एका महिन्यासाठीचे व्याजदर ८.५५ टक्के असणार आहे. तीन महिन्यासाठीचे व्याजदर ८.६० टक्के असणार आहे. याचसोबत तीन वर्षांच्यासाठीचे लोनवरीलदेखील एमसीएलआर रेट बदलले नाहीत.हे दर ८.६५ टक्के आहेत.

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिग रेट. याचा थेट परिणाम व्याजदरावर होतोय. यावरुन तुमचे व्याजदर वाढणार की कमी होणार हे ठरवले जाते. दरम्यान, एमसीएलआर रेटमध्ये कपात केल्याने सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. गृहकर्ज आणि कार लोनवरील व्याज कमी झाले आहेत.

याआधी जवळपास दोन महिन्यापूर्वी एमसीएलआर रेटमध्ये कपात केली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली. रेपो रेट ५.५ टक्के निश्चित करण्यात आला. यानंतर एचडीएफसी बँकेने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

Director-Actress : अभिनेत्रीला जवळ ओढलं, कमरेत हात टाकला अन्...; प्रसिद्ध दिग्दर्शकानं मर्यादा ओलांडल्या, VIDEO तुफान व्हायरल

"ते सेल्फी पूर्णपणे मॉर्फ केलेले..."; व्हायरल फोटोंवर मंत्री गिरीश महाजनांचा सर्वात मोठा आणि थेट खुलासा

SCROLL FOR NEXT