Pulses Price Hike saam Tv
बिझनेस

Pulses Price Hike: तुरदाळ-उडीद डाळीच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Pulses Price Hike: बाजारात डाळींचे दर वाढू लागले आहेत. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने तुरडाळ आणि उडीद डाळीचा साठ्याची मर्यादा ३० ऑक्टोबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pulses Price Hike:

बाजारात डाळींचे दर वाढू लागले आहेत. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने तुरडाळ आणि उडीद डाळीचा साठ्याची मर्यादा ३० ऑक्टोबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे. स्टॉक होल्डिंग युनिट्ससाठी स्टॉक होल्डिंग मर्यादा कमी करून सरकारने बदल जाहीर केले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, घाऊक विक्रेते आणि मोठ्या विक्रेत्यांसाठी साठा ठेवण्याची मर्यादा २०० मेट्रिक टनांवरून ५० मेट्रिक टनांपर्यंत कमी करण्यात आलीय. (Latest Business News )

तर मिलर्ससाठी स्टॉक ठेवण्याची मर्यादा सध्या ३ महिन्यांच्या किंवा वार्षिक उत्पादन क्षमतेच्या १० टक्के किंवा वार्षिक उत्पादन क्षमतेच्या 25 टक्के करण्यात आली आहे. मिलर्ससाठी स्टॉक ठेवण्याची मर्यादा कमी करण्यात आलीय. तीन महिन्याच्या किंवा वर्षाची उत्पादन क्षमता २५ टक्क्यावरून कमी करत १ महिन्याच्या उत्पादन किंवा वर्षाचे उत्पादन १० टक्के करण्यात आले आहे.

बाजारातील डाळींची साठेबाजी आणि तुरदाळ आणि उदीद डाळींच्या वाढलेले दर कमी करण्यासाठी साठ्यांवर मर्यादा घालण्यात आल्यात आहे. यामुळे प्रत्येक ग्राहकाला डाळीची उपलब्ध होईल. सरकारच्या ताज्या आदेशानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी तुरदाळ आणि उडीद डाळींचा साठा मर्यादा ही ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. आता घाऊक विक्रेते ५० मेट्रिक टन, किरकोळ विक्रेते ५ मेट्रिक टन, किरकोळ आउटलेटवाले ५ मेट्रिक टन आणि मोठे विक्रेते ५० मेट्रिक टन डाळ डेपोत ठेवू शकतात.

दरम्यान सरकारने दिलेल्या सूचनांनुसार, डाळी आयात करणारे आयातदार कस्टम क्लिअरन्सच्या तारखेपासून ३० दिवसांपासून जास्त काळ डाळींचा साठा त्यांच्याकडे ठेवू शकत नाहीत. तसेच सर्व डाळी व्यापाऱ्यांनी ग्राहक व्यवहार विभागाच्या https://fcainfoweb.nic.in/psp या वेबसाइटवर जाऊन तुरडाळ आणि उडीद डाळींचा साठा किती आहे याची माहिती द्यावी लागेल. जर त्यांच्याकडे असलेला साठा निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यांना तो ३० दिवसांच्या आत खाली आणावा लागेल.

दरम्यान २ जानेवारी २०२३ रोजी सरकारने साठेबाजी, किमतींबाबत अफवा आणि ग्राहकांना वाजवी किमतीत डाळ उपलब्ध करून देण्यासाठी तुरदाळ आणि उडीद डाळींवर साठा मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहक व्यवहार विभागाचे म्हणणे आहे की त्यांनी पोर्टलद्वारे तूरदाळ आणि उडीद डाळीच्या साठ्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT