छोटे दुकानदार, किरकोळ व्यापारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींसाठी केंद्र सरकारकडून पेन्शनची सुविधा देणारी योजना राबवली जाते. NPS for Traders म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योजनेचा उद्देश छोट्या व्यावसायिकांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळवून देणं हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांला वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचं वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच अर्जदार आयकर भरत नसावा. अर्जदाराने इतर कोणत्याही सामाजिक कल्याण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. त्याचबरोबर संबंधित व्यापाऱ्याचा वार्षिक व्यवसाय १.५ कोटी रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
NPS for Traders या योजनेत सहभागी व्यापाऱ्याचं वय ६० वर्ष झाल्यानंतर त्याला दरमहा ३,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या जीवनसाथीला पेन्शनच्या ५० टक्क्यांपर्यंत रक्कम मिळण्याची तरतूद असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे.
तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज करता येतो. ऑफलाइन अर्जासाठी जवळच्या जनसेवा केंद्रात (CSC) जाऊन अर्ज करता येतो. यावेळी आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती आवश्यक असते.
ऑनलाइन अर्जासाठी maandhan.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Self Enrolment करावे. आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेल्या OTP द्वारे पडताळणी केल्यानंतर NPS Traders पर्याय निवडून आवश्यक माहिती भरावी लागते. यामध्ये नाव, आधार क्रमांक, जन्मतारीख आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागते.
अर्जदाराच्या प्रवेशाच्या वयानुसार मासिक योगदान निश्चित केले जाते. दिलेल्या माहितीनुसार हे योगदान दरमहा ५५ ते २०० रुपयांपर्यंत असू शकते. बँकेमार्फत ऑटो-डेबिटची सुविधाही घेता येते. अर्ज पूर्ण झाल्यानंतर व्यापाऱ्याला पेन्शन कार्ड डाउनलोड करता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.