Government Job Saam Tv
बिझनेस

Government Job: कृषी विभागात नोकरीची सुवर्णसंधी; कुठे आणि कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

Krushi Vibhag Bharti: कृषी विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

Manasvi Choudhary

महाराष्ट्र कृषि विभागातर्फे नोकरीची सुवर्णसंधी आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअतर्गंत जिल्हा संसाधन पद (DRP) ही भरती आहे. कृषी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली आणि उत्तम संधी आहे. शेतीचे ज्ञान आणि कृषी विभागासंबंधीत माहिती असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

राज्य सरकार महाराष्ट्र कृषि विभागाद्वारे भरतीची जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ग्रॅज्युएट असणे बंधनकारक आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये ग्रॅज्यूएट उमेदवार या पदासाठी पात्र असतील. विविध गावातील शेतजमिनींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करता यायला हवे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर योग्य उपाय काढता यायला हवा. शेतीविषयक ज्ञान असणे आवश्यक आहे.तसेच ३ ते ५ वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

सेवानिवृत्त बँक, शासकीय अधिकारी, विमा प्रतिनिधी यांना प्राधान्य देण्यात येईल. शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यास अर्ज करता येणार नाही. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने सांगली कृषी विभागीय कार्यालयात अर्ज सादर करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Mangal-Budh Yuti: मंगळ-बुध ग्रहाची होणार महायुती; 'या' राशींची तिजोरी तुडुंब भरणार

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

SCROLL FOR NEXT