Old Pension Scheme meta ai
बिझनेस

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शनचा मार्ग मोकळा, अर्जाची शेवटची तारीख समोर

Pension Update : जम्मू-काश्मीरमधल्या पात्र NPS कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्याची संधी मिळाली आहे. पात्र कर्मचाऱ्यांना २८ डिसेंबर २०२६ पर्यंत DDO कडे अर्ज करावा लागणार असून, नंतर NPS खातं बंद होईल.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता जम्मू-काश्मीरमधल्या पेन्शनधारकांना मोठी संधी मिळणार आहे आहे. केंद्रशासित प्रदेशातल्या राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS अंतर्गत येणाऱ्या काही पात्र कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना (OPS) निवडण्याची एकदाच संधी देण्यात आली आहे. मात्र ही सुविधा सर्व NPS कर्मचाऱ्यांसाठी लागू नसून ठराविक अटी पूर्ण करणाऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.

सरकारच्या माहितीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी पद किंवा रिक्त जागेची जाहिरात २४ डिसेंबर २००९ आधी जारी किंवा अधिसूचित झाली होती. पण त्यांनी १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर सरकारी सेवेत प्रवेश केला, असं कर्मचारी या पर्यायासाठी पात्र ठरू शकतात.

पात्र कर्मचाऱ्यांना २८ डिसेंबर २०२६ पर्यंत OPSसाठी अर्ज करावा लागणार आहे. या मुदतीत अर्ज न करणारे कर्मचारी NPS अंतर्गतच कायम राहतील. विशेष म्हणजे, OPS निवडल्यानंतर पुन्हा NPSमध्ये परतण्याची परवानगी असणार नाही.

अर्ज कुठे करायचा?

पात्र कर्मचाऱ्यांनी आपला अर्ज संबंधित DDO (Drawing and Disbursing Officer) यांच्याकडे सादर करायचा आहे. त्यानंतर DDO अर्जा संबंधित HOD किंवा नियुक्ती प्राधिकरणाकडे पाठवेल. पुढे प्रशासन विभागाकडून कर्मचाऱ्याच्या सेवा आणि भरतीशी संबंधित नोंदी तपासल्या जातील. पात्रता पूर्ण झाल्यावर OPS लागू करण्यासाठी आवश्यक आदेश जारी केला जाईल.

NPS खात्याचे काय होणार?

OPS मध्ये समावेशाचा आदेश ज्या महिन्यात जारी होईल, त्याच्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून संबंधित कर्मचाऱ्याचे NPS खातं बंद केलं जाईल. त्यानंतर कर्मचाऱ्याला GPF (General Provident Fund) मध्ये योगदान द्यावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन महिन्यांत स्वाईन फ्लूचे ६२६ रुग्ण

Weight Loss : वजन घटवायचं असेल तर रात्री 'या' ५ पदार्थांना करा बाय-बाय, आठवड्याभरात दिसेल फरक

BP Medicines: BP नॉर्मल आला म्हणून गोळी बंद केली? ठरू शकतं महागात; डॉक्टरांनी सांगितलं हार्ट अटॅकचा धोका वाढतो

Navratri 2026 : दुष्काळामुळे महाराष्ट्रात दांडिया रद्द? मराठी एकीकरण समितीची मागणी

Plane Crash: उड्डाण घेताच लष्कराचे विमान कोसळलं, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT