Ladki Bahin Scheme Big Update Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : सण-उत्सव गोड होणार! लाडक्या बहिणींसाठी ३००० कोटी; फडणवीस सरकारचा शासन निर्णय

Ladki Bahin Scheme Big Update: लाडकी बहीण योजनेसाठी २०२६ - २७ मध्ये ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांना जुलैचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Sakshi Sunil Jadhav, Ganesh Kavade

लाडक्या बहि‍णींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२६ ते २७ या आर्थिक वर्षासाठी योजनेच्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी महिलांसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी एकूण ३००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

वित्त विभागाच्या संबंधित शासन निर्णयानुसार, जुलै २०२६ महिन्याच्या आर्थिक लाभासाठी ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रलर्गातल्या पात्र महिलांच्या खात्यावर योजनेचा लाभ देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.


सरकारने निधीच्या वापराबद्दल स्पष्ट निर्देशही दिले आहेत. संबंधित निधी फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांसाठीच खर्च करावा, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रवर्गातील महिलांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रतेची छाननी महत्त्वाची ठरणार आहे.

लाभ देण्याआधी पात्र लाभार्थी महिलांची योग्य पद्धतीने तपासणी आणि छाननी करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. उपलब्ध निधीचा वापर मंजूर तरतुदीनुसारच करण्यात यावा आणि निधीचा अनावश्यक किंवा इतर कारणांसाठी वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही सांगण्यात आलं आहे.

तसेच लाभार्थी महिलांची संख्या उपलब्ध करून देणं, पात्र महिलांना वेळेत लाभ मिळेल याची खात्री करणे आणि निधीच्या वितरणाची प्रोसेस नियमानुसार राबवणे ही जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पात्र महिलांनी आपली कागदपत्रे आणि लाभार्थी म्हणून नोंदणीची माहिती अपडेट आहे की नाही, याची खात्री करून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

SCROLL FOR NEXT