Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात घसरण सुरुच; पाहा १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते.

Surabhi Jayashree Jagdish

सोनं घ्यायचा विचार करत असाल तर आजचा दिवस नक्कीच चांगला आहे. याचं कारण म्हणजे आजच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळतेय. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते.

मनी कंट्रोलच्या वेबसाईटनुसार, बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी 10 ग्रॅम सोनं स्वस्त झालं. 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,300 रुपयांच्या आसपास आहे.

दिल्ली, मुंबई, पाटणा, जयपूर, लखनऊ या देशातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये कालच्या तुलनेत सोन्याचा भाव 1,100 रुपयांनी घसरल्याची माहिती आहे. सोन्याबाबत तज्ज्ञांचं मत आहे की, सोन्याच्या किमतीत तात्पुरती घसरण झाली असून भविष्यात सोन्याच्या किमतीत वाढ होणार आहे.

आजच्या दिवशी चांदीचा भाव काय?

देशात एक किलो चांदीची किंमत 89,500 रुपयांवर आली आहे. काल चांदीचा भाव 91,500 रुपये होता. आज चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय.

विविध शहरांतील १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

मुंबई

22 कॅरेट सोनं - 70,800 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,240 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 70,800 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,240 रुपये

लखनऊ

22 कॅरेट सोनं - 70,950 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,390 रुपये

जयपूर

22 कॅरेट सोनं - 70,950 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,390 रुपये

नवी दिल्ली

22 कॅरेट सोनं - 70,950 रुपये

24 कॅरेट सोनं - 77,390 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT