Vi Max postpaid plans 
बिझनेस

VI युझर्ससाठी खुशखबर; ६ महिन्यांसाठी मिळेल या फूड डिलिव्हरी अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन, अन् OTT‍ ‍‍अ‍ॅप्सचा आनंद

Bharat Jadhav

Vi Max postpaid plans:

Vodafone-Idea प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन प्रकारचे मोबाइल प्लॅन ऑफर करते. तुम्ही कंपनीची पोस्टपेड सेवा घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. VI ने आपल्या मॅक्स पोस्टपेड प्लॅन्स अपडेट केलेत. कंपनी स्विगी फूड डिलिव्हरी ॲपचे ६ महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन आणि काही प्लॅनचे इतर काही फायदे देत आहे. VI ने सांगितले की जे युझर्स ५०१ रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा प्लॅन घेत आहेत त्यांना ६ महिन्यांसाठी फ्री स्विगी वन मेंबरशिप मिळेल. (Latest News)

या प्लासोबत फ्री मिळेल सबस्क्रिप्शन

नवीन लाभ Vi Max पोस्टपेड युझर्सला रु. ५०१ , रु ७०१ आणि रु १००१ च्या प्लॅन्स तसेच ११००१ रुपयांच्या REDX प्लॅन ही सेवा उपलब्ध असेल. १०००१ आणि १,१५१ च्या Vi मॅक्स फॅमिली प्लॅनवर सुद्धा ही सेवा उपलब्ध आहे. या नवीन ऑफर व्यतिरिक्त, कंपनी युझर्सला दोन कूपनदेखील देईल. यात त्यांना ३ महिन्यांसाठी Swiggy One चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. या कूपनची वैधता एक वर्षासाठी असेल, असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२९९ रुपयांचे फ्री सब्सक्रिप्शन

Swiggy One चे सबस्क्रिप्शन रु. २९९ मध्ये उपलब्ध आहे पण VI कंपनी युझर्सला ते मोफत देत आहे. या सब्सक्रिप्शनपासून सामान्य लोकांना कोण-कोणते फायदे मिळत आहेत. हे अनेकांना माहिती नाहीये. युझर्स निवडक रेस्टॉरंट्समधून विनामूल्य अमर्यादित डिलीव्हरी आणि Swiggy Instamart कडून अमर्यादित विनामूल्य डिलीव्हरी मिळेत.

OTT ॲप्सचा लाभ मिळेल

यासर्व प्लानसह कंपनी ३० दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याची सेवा देते. Vodafone Idea चा REDX प्लान Amazon Prime, Disney+ Hotstar, SonyLIV आणि SunNXT सारख्या OTT अॅप्स तसेच EaseMyTrip, Norton 360 Mobile Security आणि EazyDiner सारख्या सेवांचा देखील लाभ देते. Vi मोबाइल, टीव्ही ॲप आणि Vi ॲप्स आणि गेम्समध्ये हंगामा म्युझिकचा लाभही मिळत असतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner News : शेतीतून उत्पन्न नाही, दूध व्यवसायात नुकसान; विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

Papaya Face Pack : पपईपासून बनलेला हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा; स्किनवरील डाग चुटकीसरशी होतील गायब

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT