Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki bahin yojana : लाडक्या बहिणीची चांदी; दोन महिन्याचे पैसे एकत्र, पण कधी मिळणार? वाचा

ladki bahin yojana Update : लाडक्या बहिणीला महिला दिनानिमित्त सरकार डबल गिफ्ट मिळणार आहे....काय आहे हे गिफ्ट पाहूयात हा विशेष रिपोर्ट.

Bharat Mohalkar

फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार याची लाडक्या बहिणींना प्रतिक्षा होती. फेबुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का? असा सवालही केला जात होता. मात्र आता महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच लाडकींना फक्त फेब्रुवारीच नव्हे तर मार्च महिन्याचं मानधनही एकत्रित मिळणार आहे.

बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी द्विट करत ही माहिती दिली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे सात तारखेलाच सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रूपये जमा होणार आहेत.

काय आहे ट्विट?

लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट ! महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात दोन महिन्यंाचा सन्मान निधी ३००० रूपये जमा करण्यात येईल.

लाडकीला महिला दिनाचं डबल गिफ्ट

दोन महिन्यांचा निधी एकत्र देऊन लाडक्या बहिणींना खूश करण्यात येत आहे तर दुसरीकडे पात्रतेचे निकषही कडक करण्यात येत आहेत.

गेल्या दोन महिन्यांत 9 लाख लाभार्थीची संख्या कमी झाली आहे. छाननीत जानेवारी महिन्यात 5 लाख, तर फेब्रुवारीत 4 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. योजनेचे निकष लावल्यानंतर टप्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील खर्च दरमहा 135 कोटी आणि वर्षाला 1620 कोटी रुपयांनी वाचणार आहे.

कठोर पडताळणीमुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या प्रत्येक महिन्यात घटत चालली असल्यानं लाडक्या बहिणींचं टेन्शनही वाढलंय. तर महिला दिनाचं हे गिफ्ट मिळालं असतानाही लाडक्या बहिणींची 1500 चा हफ्ता 2100 रुपये कधी होणार याचीही उत्सुकता कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी गिफ्टसाठी हट्ट, मालकाकडून शिवीगाळ करत अमानुष मारहाण, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Today's Panchang: आज कार्तिक शुक्ल तृतीया; अनुराधा नक्षत्राचा योग देणार शुभ फल, जाणून घ्या आजचं संपूर्ण पंचांग

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Shocking Death : NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, जलतरण सरावादरम्यान भयंकर घडलं; पुण्यात खळबळ

IRCTC New Rule: आता रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही; IRCTC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT