Gold Silver Rate (28th December 2023) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (28th December 2023): वर्षअखेरीस ग्राहकांना जोरदार झटका; सोन्याचा भाव उच्चांकी पातळीवर, दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Today's (28th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: आज सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मागील सहा दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसून आली. काल बुधवारी सोने ६३ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (28th December 2023):

आज सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मागील सहा दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसून आली. काल बुधवारी सोने ६३ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.

मागच्या तीन आठवड्यानंतर सोने पुन्हा एकदा उच्चांकी भावावर पोहोचले आहे. आज गुरुवारी गुरुपुष्यामृतयोगावर ग्राहकांचा कल खरेदी करण्याकडे अधिक असेल. तसेच सोन्याचा भाव आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढत असताना भारतातही लग्नसराईमुळे मोठ्या प्रमाणात या मौल्यवान धातूची खरेदी केली जात आहे. गुरुवार २८ डिसेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग असल्याने या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा कल अधिक असेल.

४ डिसेंबर रोजी सोन्याचा (Gold) भाव प्रतितोळा ६४,३०० रुपयांच्या ऐतिहासिक उंचीवर पोहोचले. अशातच आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज २४ कॅरेटनुसार ४४० रुपयांनी वाढले आहे.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,९०५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६४,४०० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)वाढ झालेली आज पाहायला मिळाली. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७९,५०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६४,२५० रुपये

  • पुणे - ६४,२५० रुपये

  • नागपूर - ६४,२५० रुपये

  • नाशिक - ६३,२८० रुपये

  • ठाणे - ६४,२५० रुपये

  • अमरावती - ६४,२५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

SCROLL FOR NEXT